Neena Gupta on faltu feminism comment : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांनी त्यांच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली आहेत. नीना या नेहमीच त्यांना वाटतं त्या मुद्यावर स्पष्टपणे मत मांडताना दिसतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्यांनी फेमिनिजमवर त्यांचं मत मांडलं होतं. त्या मुलाखतीतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावरून सोशल मीडियावर ट्रोलिंग करण्यात येत आहे. आता त्यावर नीना गुप्ता यांनी वक्तव्य केलं आहे.
नीना गुप्ता यांनी नुकतीच एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी केलेल्या फेमिनिझमवर वक्तव्य केलं होतं. त्यावर त्या आता म्हणाल्या की लोकांना वाद वाढवायचे असतात त्यामुळे ते मुलाखतीतील काही चंक शेअर केले. मात्र, माझ्या बोलण्याचा अर्थ असा नव्हताच. नीनानं यांनी म्हटलं की वाद करण्यासाठी संपूर्ण मुलाखतीतील एक भाग प्रमोट करण्यात आला. यात म्हटलं आहे की मी फालतू फेमिनिजमवर विश्वास करत नाही आणि त्यानंतर लोक एकमेकांशी भांडू लागतात. जर एखादी व्यक्त मी असं म्हटल्यानं मला ट्रोल करत असेल तर दुसरा म्हणतो की तुम्हाला काय माहित संपूर्ण मुलाखत पाहा. त्यामुळे मी काही म्हटलं त्याला एक संदर्भ असायला हवा.
नीना यांनी यावेळी थोडक्यात सांगितले की त्या सोशल मीडियावर जे काही शेअर करते त्याबाबत त्या नेहमी सतर्क असतात. नीना म्हणाल्या, 'चूका होत नाहीत असे नाही, माझ्याकडूनही अनेकदा चुका झाल्या आहेत. मात्र, काही लोक असेही आहेत जे विचार न करता सोशल मीडियावर आपली मते मांडतात. मी तुम्हाला सांगायचे आहे की मला राग आला असेल किंवा माझे कोणाशी भांडण झाले असेल तर मी सोशल मीडियावर काहीही पोस्ट करत नाही. मी सर्वांना सल्ला देते की तुम्ही नशेत असाल तर पोस्ट करू नका. असे केल्यास नंतर पश्चाताप करावा लागेल. सोशल मीडियावर किंवा मुलाखतीत काहीही बोलण्यापूर्वी योग्य भाषेचा वापर करा, कारण तुम्ही जे बोलता ते बरेच लोक ऐकत असतात.
हेही वाचा : प्रसाद खांडेकरसोबतच्या कथित वादावर उघडपणे बोलले भाऊ कदम; म्हणाले- 'आम्ही प्रतिस्पर्धी...'
नीना गुप्ता यांनी काही दिवसांआधी फेमिनिजमवर त्यांची प्रतिक्रिया दिली. नीना गुप्ता म्हणाल्या की, स्त्री आणि पुरुष कधीही समान असू शकत नाहीत. म्हणूनच त्या स्त्रीवाद आणि त्याच्याशी संबंधित समस्यांना फालतू म्हणाल्या होत्या. नीना यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर वाद निर्माण झाला होता.