उशीरा का होईना पण माझी वेळ आली - नीता गुप्ता

अभिनेत्री नीनी गुप्ता सध्या चांगल्याच व्यस्त आहेत.  

Updated: Jan 23, 2020, 04:50 PM IST
उशीरा का होईना पण माझी वेळ आली - नीता गुप्ता title=

मुंबई : आपल्या अभिनयाने सगळ्याच प्रेक्षकांच मन जिंकणाऱ्या नीना गुप्ता त्यांच्या नव्या स्टाईलमुळे कायम चर्चेत असतात. अभिनेत्री नीनी गुप्ता सध्या चांगल्याच व्यस्त आहेत. त्या लवकरच 'पंगा'या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. 'पंगा' चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यकमात त्या उपस्थित होत्या. या कार्यक्रमात त्यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या चांगलचं चर्चेत आलं आहे. 

'उशीरा का होईना पण माझी वेळ आली' असं त्या म्हणाल्या. त्याचप्रमाणे यावेळी त्यांनी राकेश बेदी लिखीत एक कविता देखील सादर केली, 'मेरा टाइम आ गया, मेरा टाइम आ गया. फिर मैं सोचूं मेरा टाइम मुझे छोड़कर गया ही कब था? मैं ही लंबी छुट्टी पर थी. काम पर ध्यान दिया ही कब था.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Written by @therakeshbedi #panga

A post shared by Neena ‘Zyada’ Gupta (@neena_gupta) on

आता मला काम मिळत असल्यामुळे मी फार खूश आहे, असं देखीलत्या म्हणाल्या. पंगा चित्रपटात त्या अभिनेत्री कंगना रानौतच्या आईची भूमिका साकारताना दिसणार आहेत. 'पंगा' चित्रपटाशिवाय त्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान' आणि अभिनेता अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' चित्रपटात देखील झळकणार आहेत. 

तर, अश्विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित 'पंगा' हा चित्रपट २०२०मध्ये प्रदर्शित होणार आहे. कंगना येत्या काळात Panga 'पंगा' या चित्रपटातून एका कबड्डीपटूच्या भूमिकेत झळकणार आहे.