'त्या' फोटोवरुन नेहा-अंगद ट्रोल!

अलिकडेच बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने प्रेग्नेंसीची गुड न्यूज सोशल मीडियावरुन चाहत्यांसोबत शेअर केली.

Updated: Aug 28, 2018, 08:34 AM IST
'त्या' फोटोवरुन नेहा-अंगद ट्रोल!

मुंबई : अलिकडेच बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने प्रेग्नेंसीची गुड न्यूज सोशल मीडियावरुन चाहत्यांसोबत शेअर केली. त्यामुळे नेहा-अंगदच्या लग्नानंतर उठलेल्या अफवा खऱ्या ठरल्या. नेहाचा ३८ वा वाढदिवस नुकताच झाला. त्यानिमित्याने नेहाने पती अंगद बेदीसोबत एक रोमांटिक फोटो शेअर केला. 

या फोटोत दोघेही समुद्रकिनारी उभे आहेत. अंगद नेहाला किस करत आहे. पण नेहाने हात मध्ये ठेवला आहे. हा फोटो शेअर करत अंगदने खूप छान कॅप्शन दिले. अंगदने लिहिले की, हॅप्पी बर्थडे माय वर्ल्ड... पण या फोटोवरुन दोघेही चांगलेच ट्रोल झाले.

 

Happy birthday my world @nehadhupia mrs DhupiaBedi #happybirthday

A post shared by Angad Bedi (@angadbedi) on

एका ट्रोलरने लिहिले की, तोंडातून वास येत आहे का म्हणून मध्ये हात ठेवला आहे. तर एकाने लिहिले की, लग्नापूर्वी प्रेग्नेंट झाल्यामुळे लग्न करावे लागले. प्रेम वगैरे असे काहीच नाही. 
तर काही जणांनी नेहाला शुभेच्छाही दिल्या. नेहा-अंगद १० मे रोजी गुपचूप विवाहबद्ध झाले. त्यांनी अचाकन लग्न केल्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आता दोघांच्या आयुष्यात लवकरच नवा पाहुणा येणार आहे.