उफ्फsss..! खांद्यावरून सरकलेला शर्ट, रोखलेली नजर... अभिनेत्रीच्या बोल्ड लूकनं धुमाकूळ

अभिनेत्री नेहा शर्माने इन्स्टाग्रामवर तिचा नवे फोटो शेअर केले आहेत. जे काही मिनिटांत व्हायरल झाले आहेत.

Updated: May 3, 2022, 03:18 PM IST
उफ्फsss..! खांद्यावरून सरकलेला शर्ट, रोखलेली नजर... अभिनेत्रीच्या बोल्ड लूकनं धुमाकूळ title=

मुंबईः छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत मजल मारलेली अभिनेत्री नेहा शर्मा सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती दररोज तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता पुन्हा एकदा नेहा शर्माने इन्स्टाग्रामवर तिचा नवे फोटो शेअर केले आहेत. जे काही मिनिटांत व्हायरल झाले आहेत.

नेहा शर्माच्या या फोटोंमध्ये तिची अतिशय सिझलिंग स्टाइल दाखवताना दिसत आहे.

फोटोंमधून तुम्ही शकता की, नेहा तिच्या काळ्या रंगाच्या ओव्हरसाईज शर्टची बटणे उघडून ब्लॅक ब्रालेट दाखवत आहे. यावेळी नेहाने न्यूड मेकअप केला असून नेहाच्या बोल्ड लूकवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

नेहा शर्मा अनेकदा बातम्यांचा एक भाग राहते. अर्थात तिच्या अभिनयाच्या जोरावर ती लोकांची मने जिंकू शकली नाही.पण नेहाने नेहमीच तिच्या स्टायलिश आणि बोल्ड लूकने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेहा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते.

जवळपास दररोज ती तिचे फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. नेहा शर्माचे हे फोटो सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय बनले आहेत. नेहा शर्मच्या बोल्डनेसवर तिचे चाहते फिदा आहेत.