1, 2, 3 बोल दे धक्काssss; उडणारं नव्हे, चालणारं विमान कधी पाहिलंय का?

चला पळा रे .... 

Updated: Dec 3, 2021, 03:12 PM IST
1, 2, 3 बोल दे धक्काssss; उडणारं नव्हे, चालणारं विमान कधी पाहिलंय का?
छाया सौजन्य- सोशल मीडिया

काठमांडू : सहसा एखादं वाहन बंद पडलं की, ते धक्का मारुन सुरु करण्यासाठीच पहिला प्रयत्न केला जातो. हा प्रयत्न यशस्वी कितपत ठरतो ही मात्र पुढची गोष्ट. 

वाहनापर्यंत ठीक आहे, पण तुम्हाला माहितीये का नेपाळमध्ये एक अशी घटना घडली की, प्रवाशांना चक्क एका विमानाला धक्का मारावा लागला. 

नेपाळच्या बजराच्या कोल्टी विमानतळावर ही घटना घडली. या विमानतळावर तारा एअरलाईन्सच्या एका विमानाचा टायर फुटला आणि ते रनवेवरच फसलं.

विमानच अडकल्यामुळे इतर विमानांना विमानतळावर उतरता येईना. त्यातच विमानतळावर टोईंगची सुविधाही नव्हती. शेवटी काय, तर धक्का मारो... 

अखेर विमानळावरील सुरक्षा रक्षक आणि विमानातील प्रवाशांनी या विमानाला धक्का दिला. 

जोर लगा केssss... असं म्हणत या मंडळींनी चक्क धक्का देऊनच विमान रनवेपासून दूर नेलं.

नेपाळमधल्या या विमानतळावरचा हा मजेशीर प्रकार सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 

हा प्रसंग मजेशीर असला तरीही प्रशासनानं याकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं असल्याचाही सूर सध्या आळवण्यात येत आहे.