ती व्यक्ती मुंबईत येण्याआधी Sharmila Tagore च्या Bikini चे होर्डिंग्ज एका रात्रीत का हटवले

Sharmila Tagore चे मुंबईतले Bikini फोटोजचे होर्डिंग्ज एका रात्रीत हटवले होते...

Updated: Dec 3, 2021, 02:13 PM IST
ती व्यक्ती मुंबईत येण्याआधी Sharmila Tagore च्या Bikini चे होर्डिंग्ज एका रात्रीत का हटवले  title=

मुंबई : आता पाहायला गेलं तर प्रत्येक अभिनेत्री बिकिनीमध्ये फोटोशूट करत त्यांची परफेक्ट बॉडी फ्लाँट करत असतात. पण पूर्वी  या सर्व गोष्टी फार कठीण होत्या. एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्रीने बिकिनी घालणे फार वाईट मानले जात असे. पण तेव्हा बिकिनीमध्ये फोटोशूट करणाऱ्या पहिल्या अभिनेत्री होत्या त्या म्हणजे शर्मिला टागोर.  'काश्मीर की कली', 'वक्त', 'आमने-सामने' यांसारख्या उत्कृष्ट सिनेमांमध्ये अविस्मरणीय अभिनय करत प्रेक्षकांच्या मनात वेगळा ठसा उमटवला.

आपल्या काळातील अतिशय बोल्ड अभिनेत्री ठरलेल्या शर्मिला यांचा जन्म एका हिंदू बंगाली कुटुंबात झाला होता. 60 आणि 70 च्या दशकात चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी असे काही केले ज्यामुळे तिला रातोरात त्यांना महत्त्वाचा पाऊल उचलावे लागले. 

'ऍन इविनिंग इन पॅरिस' या चित्रपटाच्या वेळचा एक अत्यंत रंजक किस्सा प्रेक्षकांचं आजही लक्ष वेधतो. त्यावेळी शर्मिला (Sharmila Tagore) आणि मंसूर अली खान पटौदी (Mansoor Ali Khan Pataudi ) हे रिलेशनशिपमध्ये होते. तेव्हाच मंसूर यांची आई, शर्मिला यांना भेटण्यासाठी मुंबईला येणार होत्या. 

तेव्हा मुंबईत सर्वत्र स्विमसूटमधील शर्मिला टागोर यांचे फोटो लावले होते. आता मंसूर यांची आई मुंबईत येणार असल्याचं ऐकत शर्मिलांना धडकीच भरली. त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांशी तातडीनं संपर्क साधत चित्रपटाचे पोस्टर्स शहराच्या प्रत्येक ठिकाणहून हटवले.