'दबंग ३' चित्रपटाचा 'मुन्ना बदनाम हु्आ'

 'मुन्ना बदनाम हुआ' गाण्याची ऑडिओ क्लिप प्रदर्शित

Updated: Nov 11, 2019, 10:18 PM IST
'दबंग ३' चित्रपटाचा 'मुन्ना बदनाम हु्आ'

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या बहुचर्चित 'दबंग ३' चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत येत आहे. चित्रपटाचा टीझर, ट्रेलर, मेकिंग व्हिडिओ आणि आता प्रदर्शित होत असलेले गाणे चाहत्यांची मने जिंकत आहे. 'यू करेंगे' या गाण्यानंतर 'मुन्ना बदनाम हुआ' गाण्याची ऑडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली आहे. परंतु गाण्याचा व्हिडिओ मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. 

'दबंग' चित्रपटातील 'मुन्नी बदनाम हुई' या गाण्याला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. या गाण्याच्या लोकप्रियतेनंतर निर्मात्यांनी 'मुन्ना बदनाम हुआ' या गाण्याला प्राधान्य दिले आहे. 

'मुन्ना बदनाम हुआ' या गाण्याला गायक बादशाहा, कमाल खान, ममता शर्मा यांनी आवाज दिला आहे. तर प्रसिद्ध गीतकार साजित-वाजिद यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. महत्तवाचं म्हणजे 'लवयात्री' फेम अभिनेत्री वरीना हुसैन सलमानसोबत थिरकनार आहे.