‘भाभीजी’ फेम शिल्पा शिंदेचं हॉट आयटम साँग रिलीज

‘भाभीजी घर पर है’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे एका नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येत आहे.

Updated: Sep 6, 2017, 01:19 PM IST
‘भाभीजी’ फेम शिल्पा शिंदेचं हॉट आयटम साँग रिलीज title=

मुंबई : ‘भाभीजी घर पर है’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे एका नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येत आहे.

अंगुरी भाभी म्हणून लोकप्रिय असलेली ही अभिनेत्री एका आयटम सॉंगच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांसमोर आली आहे. या गाण्यात तिचा हॉट अँड बोल्ड अवतार प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ‘पटेल की पंजाबी शादी’ या आगामी सिनेमातील ‘मारो लाईन’ हे गाणं रिलीज झालं आहे. यात प्रेम चोप्रा, परेश रावल आणि ऋषी कपूर यांसारखे दिग्गज अभिनेतेही आहेत.

‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेतल्या ‘अंगुरी भाभी’च्या भूमिकेमुळे शिल्पा शिंदे घरा-घरात पोहोचली. त्यानंतर काही कारणास्तव शिल्पाने मालिकेला राम राम ठोकला. त्यानंतर ती बराच काळ गायब होती. मात्र, ‘पटेल की पंजाबी शादी’मधील आयटम साँगमुळे तिने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

ऐश्वर्य निगम आणि नेहा कक्कड यांच्या आवाजातील या गाण्याला जलित पंडीत यांनी संगीत दिले आहे. याआधी याच सिनेमातील ‘पंजाबी-गुजराती सगाई सांग’ हे गाणंही रिलीज झालं आहे.