New Year 2021 : Alia Bhatt ने Ranbir Kapoor सोबत असं केलं नवं वर्षाचं स्वागत

आलिया - रणबीरचीच चर्चा 

Updated: Jan 1, 2021, 04:14 PM IST
New Year 2021 : Alia Bhatt ने Ranbir Kapoor सोबत असं केलं नवं वर्षाचं स्वागत  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) चं नवं वर्ष अतिशय खास आहे. रणबीर कपूरने आपल्या गर्लफ्रेंड आलिया आणि कुटुंबासोबत राजस्थानमध्ये नवीन वर्षाचं सेलिब्रेशन केलं आहे. नवीन वर्षाच्या स्वागताच्यावेळी कपूर आणि भट्ट कुटुंबिय एकत्र आहेत. 

आलिया (Alia Bhatt) ने राजस्थानला पोहोचल्यानंतर आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर अनेक फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने 'वेलकम टू द जंगल' असं कॅप्शन देतं टायगरसोबतचा फोटो शेअर केलं आहे. सोबतच आलियाने रणथंभौरचा उल्लेख देखील केलं आहे. आलियाने या अकाऊंटवर अतिशय सुंदर फोटो शेअर केला आहे. 

नवीन वर्षातील आलियाची पहिली सकाळ 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt  (@aliaabhatt)

नवीन वर्षात सकाळच्या सूर्याच्या किरणांसोबत आलिया भट्ट (Alia Bhatt) ने फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती अतिशय फ्रेश दिसत आहे. तिने बेज रंगाचे पोंचो स्टाइल ओवर कोट कॅरी केला आहे. या फोटोत आलिया हातात कप घेऊन दिसत आहे. या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं आहे की,'काही दिवस आनंदाला कॉफी, ब्रीझ आणि झाडाचा वास येईल.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt  (@aliaabhatt)

अशी झाली आलियाची पार्टी

आलियाने या अगोदर न्यू ईअर पार्टीचा अतिशय सुंदर फोटो ३१ डिसेंबर रोजी शेअर केला. याच्या कॅप्शनमध्ये आलियाने लिहिलं आहे की,येणारं वर्ष काही तरी घेऊन येईल. ती त्या सगळ्या गोष्टींसाठी सज्ज आहे. आलियाने लिहिलं आहे की, 'जीवनात पुढे काहीही येऊ दे त्यासाठी चिअर्स.'