नवीन वर्षात सुशांत सिंग राजपूतच्या फेसबूक अकांऊटवर मोठी हालचाल

 सुशांत सिंग राजपूत आजही चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे

Updated: Jan 2, 2022, 08:03 PM IST
नवीन वर्षात सुशांत सिंग राजपूतच्या फेसबूक अकांऊटवर मोठी हालचाल  title=

मुंबई : सुशांत सिंग राजपूत आजही चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे. आजही त्यांची आठवण त्याच्या प्रत्येक चाहत्याला येते. अनेक चाहते सुशांत सिंग राजपूतच्या सोशल मीडिया अकाउंटला भेट देतात आणि त्याच्या जुन्या पोस्ट्स पाहतात आणि लाईक्स कमेंट करतात.

नुकतीच अशी एक गोष्ट घडली आहे. जी पाहून, सुशांतच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसत आहे.  1 जानेवारीला त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. चाहत्यांना ही गोष्ट धक्कादायक वाटत होती. पण ही पोस्ट सुशांतची मोठी बहीण श्वेता सिंग हिने केली आहे. ही पोस्ट पाहून. सुशांतचे चाहते पुन्हा भावूक झाले आहेत.

सुशांतची बहिण श्वेता सिंहने दिल्या शुभेच्छा
सुशांतची मोठी बहिण श्वेता सिंग कीर्तीने त्याच्या फेसबुक अकाउंटवरून चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. श्वेता सिंहने सुशांतच्या फेसबुक अकाऊंटवरून केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. श्वेता सिंग कीर्ती भाईच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देतो.'' सुशांतच्या अकाऊंटवरील श्वेताच्या या पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि सुशांतच्या चाहत्यांनी पोस्टवर कमेंटचा वर्षाव करण्यास सुरुवात केली.