निया शर्मा म्हणाली 'दो घुंट मुझे भी पिला दे शराबी....' आणि पुढे... 

या व्हिडिओमध्ये निया तिच्या ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसत आहे.

Updated: Sep 6, 2021, 08:57 PM IST
निया शर्मा म्हणाली 'दो घुंट मुझे भी पिला दे शराबी....' आणि पुढे... 

मुंबई : निया शर्माचं 'दो घुट मुझे भी पिला दे' हे नवं गाणं रिलीज झालं आहे, जे येताच इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये निया तिच्या ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसत आहे. आपल्या बोल्ड स्टाईलमुळे अनेकदा चर्चेत असणारी निया यावेळी 'दो घुंट मुझे भी पिला दे'मुळे चर्चेत आहे.

निया शर्मा सोशल मीडियावर तिच्या या गाण्याचं सतत प्रमोशन करत होती. अलीकडेच निआने तिचा पांढऱ्या ड्रेसमधला फोटो शेअर केला आणि सांगितलं की, तिचं गाणं लवकरच रिलीज होणार आहे. तेव्हापासून चाहते तिच्या या गाण्याची आतुरतेने वाट पाहत होते. यूट्यूबवर या गाण्याचं चाहते भरभरुन कौतुक करताना दिसत आहेत. गाण्यातली नियाची स्टाईल लोकांना खूप आवडली आहे. हे गाणं श्रुती राणे यांनी गायलं आहे.  या गाण्याचे ओरिजनल लिरिक्स आनंद बक्षी यांनी लिहिले होते.

निया अलीकडेच 'बिग बॉस ओटीटी'मध्ये दिसली होती. निया शर्माने 'एक हजारों में मेरी बेहना है' मध्ये मानवीच्या भूमिकेने प्रेक्षकांना चकित केलं. यानंतर निया 'जमाई राजा'मध्ये दिसली. निया शर्मा 2017 आणि 2020च्या फियर फॅक्टर 'खतरों के खिलाडी'मध्येही सहभागी झाली होती. 2017 मध्ये, निया शेवटच्या पाचमध्ये समाविष्ट होती, तर गेल्या वर्षी ती शोची विजेती ठरली होती. निआने 'ट्विस्टेड' आणि 'जमाई २.०' या वेब सीरिजच्या जगातही पाऊल ठेवलं.