अभिनेत्रीच्या हनीमूनचा रोमान्स मालदीवमध्ये, 'लव्ह बाईट' सोशल मीडियातून जगभरात LIVE

भोजपुरी अभिनेत्री निधी झा उर्फ ​​लुलिया लग्नानंतर तिच्या पतीसोबत मालदीवमध्ये हनीमून एन्जॉय करत आहे.

Updated: May 12, 2022, 04:41 PM IST
अभिनेत्रीच्या हनीमूनचा रोमान्स मालदीवमध्ये, 'लव्ह बाईट' सोशल मीडियातून जगभरात LIVE title=

मुंबई : भोजपुरी अभिनेत्री निधी झा उर्फ ​​लुलिया लग्नानंतर तिच्या पतीसोबत मालदीवमध्ये हनीमून एन्जॉय करत आहे. निधीचे पती यश कुमारसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत. मालदीवमध्ये ती समुद्राच्या लाटा आणि नैसर्गिक सौंदर्याचा आनंद लुटताना दिसत आहे. त्याचबरोबर तिचा लव्ह बाईटचा व्हिडिओही समोर आला आहे.

फँन्सने नोटिस केला एक्ट्रेसचा लव्ह बाईट 
निधि झा लग्नानंतर मालदीवमध्ये पोहोचल्यानंतर किती आनंदी आहे.  याचा सोशल मीडिया अपडेट्सवरून अंदाज येतो. अलीकडेच ती हनीमूनच्या ठिकाणावरून चाहत्यांसाठी लाइव्हही आली होती. थेट सत्रादरम्यान, सोशल मीडिया युजर्सना निधीच्या गळ्यावर लव्ह-बाईट दिसला. मग काय? प्रत्येकजण लव्ह-बाईटवर आपापल्या खास प्रतिक्रिया देऊ लागलं.

इंस्टाग्राम लाईव्ह दरम्यान निधी बेडरूममधून सुंदर हवामानाचा आनंद घेताना दिसली. लाईव्ह सेशन संपल्यानंतर नवी नवरी बनलेल्या निधीने तिच्या चाहत्यांसाठी एक डान्स व्हिडिओही शेअर केला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडिओमध्ये निधी गोविंदाच्या 'आप के आ जाने से' या सुपरहिट गाण्यावर डान्स करताना दिसली. निधी आणि यश लग्नानंतर एकत्र आनंदी आहेत. हे जाणून तिचे चाहते खूश झाले आहेत. निधीपूर्वी यशचं लग्न भोजपुरी अभिनेत्री अंजना सिंहसोबत झालं होतं. पण यश आणि अंजनाचं लग्न फार काळ टिकलं नाही. यानंतर निधीच्या रूपाने यशच्या आयुष्यात पुन्हा आनंदाने दार ठोठावलं. दोघंही लग्नानंतर खूप खुश आहेत.