Deepika Padukone कुणाचं ऐकेना; आनंदाची बातमी देत एका कृतीमुळं गावभर चर्चा

करण्याची संधी तिच्या वाट्याला आल्यामुळं तिची कारकिर्द जबरदस्त वेगानं पुढे गेली. 

Updated: May 12, 2022, 04:41 PM IST
Deepika Padukone कुणाचं ऐकेना; आनंदाची बातमी देत एका कृतीमुळं गावभर चर्चा  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई: बॉलिवूडमध्ये 'शांतीप्रिया' म्हणून पदार्पण करणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या बळावर बरीच लोकप्रिय झाली. बहुविध भूमिका, तितकीच दमदार कथानकं आणि अनुभवी- मातब्बर व्यक्तींसोबत काम करण्याची संधी तिच्या वाट्याला आल्यामुळं तिची कारकिर्द जबरदस्त वेगानं पुढे गेली. 

चित्रपट म्हणू नका किंवा नानाविध पुरस्कार. दीपिकाचं कुठे नाव नाही, असं फार क्वचितच झालं असावं. किंबहुना असं झालंही नसावं. कारण, हे व्यक्तीमत्त्वंच इतकं बहुआयामी आहे. (Deepika Padukone sannes )

हल्ली म्हणे दीपिकाला जागतिक स्तरावर गाजलेल्या Cannes महोत्सवामध्ये ज्यूरी बनण्याची संधी मिळाली. यापूर्वी कोणाही भारतीय व्यक्तीला अशी संधी कधीच मिळाली नव्हती. परिणामी दीपिकाचं हे यश तिला कौतुकाची थाप देऊन गेलं. 

लुई वुईटनची ब्रँड अॅम्बेसेडर 
दीपिका सध्या कारकिर्दीत यशाच्या पायऱ्या इतक्या वेगानं चढताना दिसतेय, की ही कुणाचंच ऐकेना... असंही काहीजण कौतुकानं म्हणताना दिसत आहेत. 

तिथं कान्समध्ये दीपिकाच्या नावाची चर्चा असतानाच इथे प्रख्यात लग्जरी ब्रँड लुई वुईटनची पहिली ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवडण्यात आलं आहे. Dauphine बॅगेसाठी ती लुई वुईटनच्या नव्या कलेक्शनचा एक भाग असेल. जिथं ती 'क्रूएला' फेम अभिनेत्री एमा स्टोन आणि झोउ डोंग्यु अशा कलाकारांसोबत सहभागी होईल. 

दीपिकानं इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून तिच्या या यशाची माहिती चाहत्यांना दिली. तिच्या जीवनात आलेली ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांनाही सुखद धक्का देऊन गेली आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.