निधनाच्या एक दिवस आधी थाटात वाढदिवस केला साजरा, पतीने शेवटची मागणीही केली पूर्ण... 4 वर्षांपासून 'या' आजाराला देत होती झुंज

अभिनेत्रीचा काल दुपारी निधन झालं...

Updated: Sep 19, 2022, 01:17 PM IST
निधनाच्या एक दिवस आधी थाटात वाढदिवस केला साजरा, पतीने शेवटची मागणीही केली पूर्ण... 4 वर्षांपासून 'या' आजाराला देत होती झुंज title=

मुंबई : 'इश्कबाज' मालिकेतील अभिनेत्री निशी सिंग भादली (Nishi Singh Bhadli) यांचं निधन झालं आहे. निशी गेल्या चार वर्षांपासून अर्धांगवायू म्हणजेच (Paralysis) च्या शिकार होती आणि त्या बेड रेस्टवर होती. 17 सप्टेंबर रोजी रात्री प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर काल दुपारी ३ वाजता त्यांचा मृत्यू झाला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, त्यांचे पती संजय सिंह भादली यांनी निशी सिंह यांनी आयुष्यातील शेवटचे दिवस कसे घालवले आणि कोणत्या कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला हे सांगितले. 

आणखी वाचा : Lucky Ali यांनी का फिरवली Bollywood कडे पाठ? आयुष्यानं हेही दिवस दाखवले

संजय यांनी नुकतीच आजतकला मुलाखत दिली होती. यावेळी संजय म्हणाले, 'हो, तीन वाजता तिचा मृत्यू झाला. काल रात्री अकरा वाजता पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यादरम्यान त्यांची प्रकृती ढासळू लागली, म्हणून आम्ही तिला रुग्णालयात घेऊन गेलो. तिला या आधी देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ती तेथे 110 दिवस राहिली. मे ते 2 सप्टेंबरपर्यंत ती रुग्णालयात होती. 2 सप्टेंबर रोजी तिला डिस्चार्ज देण्यात आला होता. तर 16 सप्टेंबर रोजी तिला वाढदिवस होता. आम्ही घरी सेलिब्रेशन केलं.'

आणखी वाचा : 'पत्नी किंवा आई होण्याच्या लायक नाहीस...', Sukesh Chandrashekhar प्रकरणावर ट्रोल करणाऱ्या उर्फीला अभिनेत्रीने सुनावलं

निशीनं संजयकडे लाडू खाण्याची मागणी केली होती. 'तिला बेसनाचे लाडू खूप आवडायचे. तिनं मला लाडू खाऊ घालण्यास सांगिलतं, मग मी तिला लाडू खाऊ घातला. त्यानंतर काल दुपारपर्यंत ती बरी होती. ती पाणी मागत होती. त्यानंतर संध्याकाळपर्यंत तिची प्रकृती ढासळू लागली. तिला रक्तात जो संसर्ग वाढला आणि त्यामुळे तिच्या हृदयापर्यंत रक्त पुरवठाही बंद झाला होता. (nishi singh bhadli struggle with paralysis for 4 years ate this thing before death )

आणखी वाचा : बबीताला 'या' व्यक्तीनं विचारली एका रात्रीची किंमत, मुनमुनची प्रतिक्रिया तुम्हालाही करेल हैराण
 
पुढे इंडस्ट्रीतून मदतीसाठी कोण पुढे आलं का असं विचारता संजय सिंह म्हणाले, 'दिग्दर्शक रमेश तौरानी यांची मुलगी स्नेहा त्यांची मैत्रीण आहे. तिनं मला एक लाख रुपये पाठवले होते. 'कुबूल है' मालिकेचे निर्माते गुल खान यांनी मला 50 हजार आणि अभिनेत्री सुरभी चंदनानं 50 हजार पाठवले. तिला निशी खूप आवडत होती.'

आणखी वाचा : गौरीनं सोडली शाहरुखची साथ; तब्बल 17 वर्षांनंतर अखेर त्याच्या दारी गेली King Khan ची पत्नी

निशी सिंगच्या करिअरबद्दल ते म्हणाले, 'निशीनं केवळ 8 वर्षे इंडस्ट्रीत काम केलं. 'मान्सून वेडिंग' या चित्रपटात तिनं काम केलं होते. त्यानंतर कमल हासन आणि मामूटी यांच्या चित्रपटात काम केलं. मुंबईत आल्यानंतर तिनं मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं. त्यानंतर तिनं एक कंपनी सुरू केली, ज्यातून तिनं लव्हलीनसोबत 'स्लमडॉग मिलेनियर' चित्रपटातील मुलांचं कास्टिंग केलं. अनेक चित्रपटांमध्ये कास्टिंग केली. 'तेनाली रामा', 'निशा भाभी' आणि 'इश्कबाज' च्या शोमध्ये ती होती. ती एकदा आजारी पडली की ती पुन्हा उठलीच नाही.'