मुंबई : नव्वदच्या दशकात अशी अनेक गाणी होती जी आजही आपल्याला प्रचंड आवडतात. या गायकांपैकी 'ओ सनम', 'आ भी जा', 'गोरी तेरी आंखे' सारखे ब्लॉकबस्टर गाणी देणाऱ्या लकी अली यांची आहेत. लकी अली (Lucky Ali) अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. आज लकी अली यांचा19 सप्टेंबर रोजी 64 वा वाढदिवस आहे. लकी अलीने 'सुनो' या म्युझिक अल्बममधून गाण्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. आज ते बॉलिवूडपासून दूर असून गोव्यात 'फकिरा'चे आयुष्य जगत आहे. पण तरीही ते त्याच्या गाण्यांनी आणि लाइव्ह परफॉर्मन्सनं लोकांचे मनोरंजन करत आहे.
लकी अली हे प्रसिद्ध अभिनेता-कॉमेडियन मेहमूद यांचा मुलगा आहे. 'सुनो' या अल्बमसाठी अनेक पुरस्कार मिळाले. पण लकी अली यांनी 2015 मध्ये अचानक बॉलिवूड चित्रपटांसाठी गाणी गाणं सोडलं. लकी अली यांच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. चाहत्यांनाही समजलं नाही की असं काय घडलं ज्यामुळे लकी अली बॉलिवूडपासून दूर रहावे लागले?
आणखी वाचा : वयाने 25 वर्षे लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसले नागार्जुन, Actress नं स्वत: शेअर केले फोटो
लकी अलीनं बॉलिवूडसाठी गाणं का सोडले?
2017 मध्ये 'पॉलिवुड बॉक्स ऑफिस'ला दिलेल्या मुलाखतीत लकी अली यांनी याबद्दल सांगितले होते, 'इथे गैरवर्तन केलं जातं. बॉलिवूड आता बदललं आहे. आजकाल जे चित्रपट बनत आहेत त्याच प्रेरणा नाही आणि अशा चित्रपटांमधून शिकण्यासारखं काहीच नाही असं मला वाटतंय. आजकाल जे चित्रपट बनत आहेत त्यांच्यावर समाजावर चुकीचा प्रभाव टाकत आहेत. लोक हिंसक होत आहेत कारण त्यांना चित्रपटांमध्ये जे दाखवलं जातं ते तेच करतात. मला असं वाटतं की चित्रपटांमध्ये लोक जास्त लोभी होत आहेत धैर्याला कमी प्रमोट करण्यात येत आहे.
आणखी वाचा : गौरीनं सोडली शाहरुखची साथ; तब्बल 17 वर्षांनंतर अखेर त्याच्या दारी गेली King Khan ची पत्नी
यापूर्वी लकी अली यांनी आणखी एका मुलाखतीत सांगितलं की ते बॉलिवूडमध्ये गाणी का गात नाही. लकी अली म्हणाले होते की 'आता त्यांच्यासाठी बॉलिवूडमध्ये काहीच नाही. अब्बा (अभिनेता महमूद) यांच्या निधनानंतर त्यांच्यासाठी तिथे सर्व काही संपलं.' लकी अली म्हणाले की 'मी बॉलिवूडचा भाग नाही याचा मला आनंद आहे कारण तिथे आदर कमी आणि अनादर जास्त आहे.'