लेक आणि सूनेत नीतू कपूर करतायेत भेदभाव? आलियाच्या प्रेग्नेंसीनंतर अखेर सत्य समोर

'कहानी घर घर की...', लेक आणि सूनेत नीतू कपूर करतायेत भेदभाव?  

Updated: Jul 6, 2022, 03:45 PM IST
लेक आणि सूनेत नीतू कपूर करतायेत भेदभाव? आलियाच्या प्रेग्नेंसीनंतर अखेर सत्य समोर  title=

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट सध्या हॉलिवूड 'हार्ट ऑफ स्टोन' सिनेमाच्या शुटिंगसाठी  लंडनमध्ये आहे. नुकताच आलियाने तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. सध्या लंडन हे बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी हॉट स्पॉट बनले आहे. जिथे सेलेब्स सतत आलियाला भेटायला जात असतात. आलिया भट्टची सासू नीतू कपूर लंडनला रवाना झाल्या असून, त्यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

या व्हिडीओमध्ये नीतू कपूर मुंबई विमानतळाकडे जाताना दिसत आहे. तेव्हा पापाराझी नितू यांनी अनेक प्रश्न विचारतात.  सुनेला भेटायला लंडनला जात आहात का? याचं उत्तर देत नीतू म्हणाल्या,  'नाही, मी माझ्या मुलीला भेटणार आहे.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नीतू यांच्या अशा वक्तव्यामुळे त्या सून आणि लेकीत भेदभाव तर करत नाहीत ना? अशी प्रतिक्रिया देखील अनेकांनी दिल्या आहेत. पुढे नीतू म्हणाल्या, 'आलिया सध्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.' नीतू कपूर यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिजी

दरम्यान चित्रपट निर्माता, दिग्दर्शक करण जोहर आणि डिझायनर मनीष मल्होत्रा ​​आलियाला भेटायला लंडनमध्ये गेले होते. त्यांच्या भेटीचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.