'आपलं वय कितीही वाढलं तरी...', मिळालेल्या सरप्राईजने कुशल बद्रिके झाला भावूक

चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून घरा-घरात पोहचलेला कुशल बद्रिके त्याच्या दमदार कॉमेडीने कायमच प्रेक्षकांची मने जिंकत असतो. 

Updated: May 12, 2024, 06:34 PM IST
'आपलं वय कितीही वाढलं तरी...', मिळालेल्या सरप्राईजने कुशल बद्रिके झाला भावूक title=

मुंबई : आज मातृदिन सामन्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच साजरा करताना दिसत आहे.  त्यामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत अनेक जण त्यांच्या आईसोबत हा खास क्षण साजरा करत आहेत. अनेक कलाकार मंडळीही आपल्या आईसोबत आज फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतायेत. अनेकजण या दिवसाच्या शुभेच्छा सोशल मीडियाच्य माध्यमातून देत आहेत. चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून घरा-घरात पोहचलेला कुशल बद्रिके त्याच्या दमदार कॉमेडीने कायमच प्रेक्षकांची मने जिंकत असतो. अभिनेत्याचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. आज मातृदिनानिमीत्त कुशलने एक भावूक पोस्ट आईसाठी शेअर केली आहे. नुकतंच कुशलला  मॅडनेस मचाऐंगे इंडिया को हसायेंगे या हिंदी कॉमेडी शोच्या मंचावर मोठं सरप्राईज मिळालं आहे. या निमीत्ताने अभिनेत्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

कुशलने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहीलंय की, "आपलं वय कितीही वाढलं तरी आईच्या डोळ्यात “आपलं बालपण” कायम तरंगताना दिसतं. “mother’s Day” च्या निमित्ताने आमच्या “मॅडनेस मचायेंगे” हया कार्यक्रमात, आम्हाला surprise दिलं गेलं. त्यातला माझ्या आईचा हा video.Happy Mother’s Day to all", असं म्हणत त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.'' कुशलची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मॅडनेस मचाऐंगे इंडिया को हसायेंगे या कार्यक्रमात मदर्स डे सेलिब्रेट करण्यात आला. ज्यात कुशलच्या आईने त्याच्या बालपणीच्या काही आठवणी सांगितल्या. सध्या कुशलचा हा व्हिडीओ चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय. अनेकांनी या व्हिडीओवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केलाय. अभिनेता संतोष जुवेकरने कमेंट करत म्हटलंय, आई i love u कुश्या जिंकलंस पोरा. तर अभिनेता समिर चोगुलेने कमेंट करत म्हटलंयआम्हाला तुझा खूप अभिमान आहे कुशल.... आणि आईंना प्रणाम. तर एका चाहत्याने कमेंट करत म्हटलंय, लय भारी मित्रा आपले शाळेतील दिवस आठवतात का तुला. अशा अनेक प्रकारच्या कमेंट युजर्स या व्हिडीओवर करत आहेत.