Rohit Sharma: मला अजून काहीच बोलायचं नाही...; भर पत्रकार परिषदेत रोहित शर्मा का झाला भावूक?

Rohit Sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. यावेळी एका कारणाने भर पत्रकार परिषदेत रोहित शर्मा भावूक झाल्याचं दिसून आलं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टी-20 वर्ल्डकप खेळणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Jun 5, 2024, 09:10 AM IST
Rohit Sharma: मला अजून काहीच बोलायचं नाही...; भर पत्रकार परिषदेत रोहित शर्मा का झाला भावूक? title=

Rohit Sharma: आजपासून टीम इंडियाच्या टी-20 वर्ल्डकपच्या मिशनला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. यावेळी टीम इंडियाचा पहिला सामना आयरलँडशी होणार आहे. या सामन्यासाठी रोहित सेना पूर्णपणे तयार असून न्यूयॉर्कमध्ये संध्याकाळी 8 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. 05 जून रोजी हा सामना अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयोजित केला जाईल. 

दरम्यान या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. यावेळी एका कारणाने भर पत्रकार परिषदेत रोहित शर्मा भावूक झाल्याचं दिसून आलं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टी-20 वर्ल्डकप खेळणार आहे. 

का इमोशनल झाला रोहित शर्मा?

राहुल द्रविड हे रोहित शर्मासोबत टी-20 वर्ल्डकपमध्ये कोच आहेत. मात्र टी-20 वर्ल्डकपनंतर राहुल द्रविड टीम इंडियाचं कोचपद सोडणार आहे. वर्ल्डकपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत यावर रोहित शर्माला प्रश्न विचारण्यात आला. यावेळी बोलताना रोहित शर्मा म्हणाला, राहुल माझा पहिला आंतरराष्ट्रीय कर्णधार आहे. आम्ही त्यांना खेळताना पाहिलंय. तो आपल्या सर्वांसाठी एक उत्तम रोल मॉडल आहे. गेल्या काही वर्षांत त्याने टीमसाठी खूप काही केले. आम्ही त्याच्यासोबत जवळपास सर्व मुख्य स्पर्धा खेळलोय. आपल्याला हे करायचे आहे, हे टीमसाठी महत्त्वाचं आहे, असं सांगणारा तो पहिला व्यक्ती आहे. 

रोहित शर्मा पुढे म्हणाला, "मी त्यांना थांबवण्याची विनंती केली. मात्र त्यांना इतर वैयक्तिक गोष्टींकडेही लक्ष द्यायचं आहे. मी त्यांच्या नेतृत्वाखाली खेळताना खूप आनंद घेतला. मी त्यांना जाताना पाहू शकणार नाही. आणि याविषयी मला अजून काहीच बोलायचं नाही." यावेळी रोहित शर्मा राहुल द्रविड यांच्यामुळे भावूक झाल्याचं दिसून आलं. 

रोहित आणि राहुल यांची जोडी ठरलीये हिट

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि सध्याचे मुख्य कोच राहुल द्रविड यांची जोडी टीम इंडियासाठी मोठी धक्कादायक ठरलीये. या जोडीने टीम इंडियाने खूप काही साध्य केल्याचं दिसून आलं आहे. टीम इंडियाने 2022 मध्ये T20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. यानंतर 2023 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीपर्यंत आणि 2023 मध्ये वनडे वर्ल्डकपच्या अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला. त्याचबरोबर टी-20 वर्ल्ड कपमध्येही टीम इंडियाकडून शानदार कामगिरीची अपेक्षा आहे.