Shash And Budhaditya Rajyog: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे अनेक राजयोग निर्माण होतात. ग्रह वेळोवेळी राशी बदलतात आणि शुभ आणि राजयोग तयार करतात. शनिदेव 30 वर्षांनंतर त्यांच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शश महापुरुष राजयोग तयार झाला आहे.
याशिवाय सूर्य देव आणि बुध सध्या वृषभ राशीत भ्रमण करत आहेत. यामुळे बुधादित्य राजयोग तयार होत आहे. बुधादित्य राजयोग आणि शश राजयोग एकत्र तयार होतोय. या दोन्ही राजयोगांमुळे काही राशींच्या आयुष्यात अचानक चांगले बदल घडणार आहेत. यावेळी कोणत्या राशीच्या व्यक्तींना या दोन्ही राजयोगांचा फायदा होणार आहे, ते पाहूयात.
कुंभ राशीच्या लोकांसाठी बुधादित्य आणि शश राजयोगाची निर्मिती फायदेशीर ठरू शकते. यावेळी तुमची लोकप्रियता वाढेल. तुमचा आदरही होईल. राजकारणाशी संबंधित असलेल्यांना यावेळी यश मिळू शकणार आहे. तुमचं लव्ह लाईफ रोमँटिक राहणार आहे. तुमचं मन कमाईने आणि कामाच्या ठिकाणी प्रगतीने प्रसन्न राहणार आहे. या काळात तुम्ही कोणतेही वाहन आणि मालमत्ता देखील खरेदी करू शकता.
बुधादित्य राजयोग आणि शश राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतात. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळणार आहे. जर तुमची कारकीर्द राजकारणाशी संबंधित असेल तर तुम्हाला त्यात चांगलं यश मिळू शकतं. या काळात तुम्ही निवडणूक जिंकू शकता. या काळात बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. जर तुम्ही व्यापारी असाल तर या काळात तुम्ही चांगला नफा कमवू शकता.
शश आणि बुधादित्य राजयोगाची निर्मिती वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. या काळात तुमचा मान-सन्मान वाढेल. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे देखील मिळू शकतात. राजकारणाशी संबंधित असाल तर तुम्हाला त्यात चांगले यश मिळू शकते. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा आणि प्रभाव वाढणार आहे. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहील. यावेळी तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )