'पद्मावती आणि खिलजीमध्ये रोमॅटिंक सिक्वेन्स नाही'

पद्मावती या चित्रपटामध्ये राणी पद्मावती आणि अल्लाऊद्दीन खिलजी यांच्यामध्ये कोणताही रोमॅटिंक सिक्वेन्सनसल्याचं दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांनी स्पष्ट केलं आहे.

Updated: Nov 8, 2017, 08:47 PM IST
'पद्मावती आणि खिलजीमध्ये रोमॅटिंक सिक्वेन्स नाही'

मुंबई : पद्मावती या चित्रपटामध्ये राणी पद्मावती आणि अल्लाऊद्दीन खिलजी यांच्यामध्ये कोणताही रोमॅटिंक सिक्वेन्स नसल्याचं दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अफवा थांबवण्यासाठी संजय लीला भन्सालींनी हे वक्तव्य केलं आहे.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्यामध्ये या चित्रपटामध्ये कोणतीच बातचित झालेली नाही, असं भन्सालींनी व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं आहे. रणवीर आणि दीपिकानं एकही दिवस पद्मावतीचं शूटिंग एकत्र केलं नाही. हे दोघं एकत्र असण्याची अफवा कशी पसरली हे आम्हाला माहिती नाही, अशी प्रतिक्रिया भन्सालींच्या जवळच्या एका सूत्रानं दिली आहे.

संजय लीला भन्सालींच्या पद्मावती चित्रपटावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहेत. दुसऱ्या धर्मावर चित्रपट काढण्याची हिंमत भन्सालींमध्ये आहे का? हिंदू गुरू, देव-देवता आणि योद्ध्यांवर भन्साली चित्रपट काढतात, हे सहन केलं जाणार नाही, असं वक्तव्य मंत्री गिरीराज सिंग यांनी केलं होतं.

संजय लीला भन्सालींचा पद्मावती १ डिसेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये दीपिका राणी पद्मावतीच्या भूमिकेत दिसणार आहे. याचबरोबर शाहिद कपूर राजा रतन सिंगची भूमिका साकारतोय.