नोरा फतेहीसोबत थिरकला गोविंदा, पाहा जबरदस्त व्हिडिओ

नुकताच या गाण्यावर नोराने एक रिल व्हिडिओ देखील शूट केला आहे.

Updated: Jul 28, 2021, 09:06 PM IST
 नोरा फतेहीसोबत थिरकला गोविंदा, पाहा जबरदस्त व्हिडिओ

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीचा मोठा चाहतावर्ग आहे. नोराच्या हटके डान्स अंदाजावर सगळेच फिदा आहेत. तिच्या प्रत्येक अल्बम साँगची चर्चा पाहायला मिळते. त्यात आता नोरा नवं गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

या गाण्याचं नाव 'जालिमा कोका कोला' (Zaalima Coca Cola) असं आहे. या गाण्यात नोराने पुन्हा एकदा आपल्या बोल्ड अंदाजाने सगळ्यांच लक्षवेधून घेतलं आहे. या गाण्याला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळताना दिसून येत आहे. 1 तासात हा व्हिडिओला 5 लाख लोकांनी पाहिला आहे.

श्रेया घोषाल यांच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं आहे. नुकताच या गाण्यावर नोराने एक रिल व्हिडिओ देखील शूट केला आहे. ज्यात नोरासोबत गोविंदा आणि गणेश आचार्य यांनी ताल धरला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Govinda (@govinda_herono1)

नोराचे हे गाणं गणेश आचार्य यांनी कोरियोग्राफ केलं आहे.