भुकेलेल्या सिंहापुढे एवढी सहज कशी गेली नोरा?

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Updated: Feb 4, 2022, 07:58 PM IST
भुकेलेल्या सिंहापुढे एवढी सहज कशी गेली नोरा? title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनेत्रीची ग्लॅमरस स्टाईल लोकांना प्रचंड आवडते. पण यावेळी नोराने असं काम केलं की लोक थक्क झाले आहेत. नोरा फतेहीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आपल्या स्टाईल आणि सुंदर फोटोंद्वारे चाहत्यांची मने जिंकणारी नोरा फतेही यावेळी एका वेगळ्या अंदाजात दिसली. यावेळी तिने कोणत्याही स्टायलिश फोटो किंवा डान्स मूव्हमुळे लाईमलाइट आली नाही तर, यावेळी तिने असं काही काम केलय जे पाहून चाहत्यांचीही धडधडत वाढत होती. नोरा फतेही सध्या व्हेकेशन मोडमध्ये आहे. जिथून याआधीही काही सिझलिंग फोटो शेअर केले आहेत. अलीकडे ती व्हाईट लायनसोबत फोटो क्लिक करतानाही दिसली होती. आता या सिंहासोबत नोरा फतेहीने असा पराक्रम केला आहे की, तो पाहून तिचे चाहते थक्क झाले आहेत.

नोरा फतेहीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या हातात मांसाचा तुकडा दिसत आहे.  आपल्या हातात मांसाचा तुकडा धरून, नोरा फतेही भुकेल्या सिंहांला स्वतःच्या हातांनी मांस भरवायला जाते. हा व्हिडिओ समोर येताच नोरा फतेहीच्या चाहत्यांची धडधड होणं साहजिकच आहे. नोरा फतेहीने स्वत: या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, हे भयानक आहे. त्यानंतर जे घडलं ते आणखीनच भयावह होतं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडिओ व्हायरल
व्हिडिओच्या सुरुवातीला नोरा फतेही हातात मांस घेऊन सिंहाला कसं खायला घालायचं ते सांगत आहे. प्राणिसंग्रहालयाच्या कर्मचार्‍यांनी नोरा फतेहीला सूचना केली  होती की, तिने कोणत्याही परिस्थितीत तिचा तळहाता सरळ ठेवावा आणि पटकन तो तुकडा सिंहाला खायला द्यावा. एका धाडसी मुलीप्रमाणे नोरा फतेही पूर्ण आत्मविश्वासाने सिंहाजवळ जाते. आणि पटकन तिचा हात पुढे करते. सिंह सारखा या क्षणाची वाट पाहत होता. तो मांसाचा तुकडा त्याच्या तोंडाजवळ येताच तो मांस खाऊन टाकतो. काही वेळापूर्वी पोस्ट केलेल्या नोरा फतेहीच्या या धाडसी व्हिडिओवर चाहते लाइक्सचा वर्षाव करत आहेत.