मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनास (Nick Jonas) यांनी त्यांच्या चाहत्यांना एक बातमी दिली. ज्याची सध्या सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहे. प्रियांकाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती पोस्ट करत सांगितले की, दोघेही आई-वडील झाले आहेत आणि त्यांच्या मुलाचा जन्म सरोगसीद्वारे झाला आहे. मात्र, त्यांना मुलगा झाला की मुलगी हे अद्याप समोर आलेले नाही. परंतु तुम्हाला माहित आहे का? फक्त प्रियांका-निकच नाही, तर आणखी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटिंनी सरोगसीचा सहारा घेतला आहे.
आज या रिपोर्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशा बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी मुलाच्या जन्मासाठी IVF आणि सरोगसीचा मार्ग स्वीकारला आहे. या यादीवर एक नजर टाकूया.
सरोगसीच्या माध्यमातून तुषार कपूर लग्न न करताच आपल्या मुलाचा सिंगल वडिल झाला आहे. लक्ष्याचा जन्म जून 2016 मध्ये झाला होता. तुषार अजूनही अविवाहित आहे आणि तो त्याच्या मुलाचा एकल पालक आहे.
सरोगसीचा पर्याय निवडल्यानंतर सनी लिओन आणि तिचा पती डॅनियल वेबर यांना जुळी मुले झाली. 2018 मध्ये या जुळ्या मुलांचा जन्म झाला.
90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीने 2020 मध्ये तिच्या दुसर्या मुलाच्या (समिषा) जन्माची घोषणा केली, त्याचा जन्म सरोगसीद्वारे झाला.
2013 मध्ये शाहरुख खान आणि गौरी खान यांचा धाकटा मुलगा अबराम सरोगसीच्या माध्यमातून या जगात आला.
निर्माता एकता कपूर जानेवारी 2019 मध्ये सरोगसीद्वारे तिचा मुलगा रवीची सिंगल मदर बनली.
फेब्रुवारी 2008 मध्ये फराह 43 वर्षांची होती जेव्हा त्यांना तीन मुले होती. IVF हा एक आशीर्वाद आहे आणि त्यामुळे माझे जीवन बदलले म्हणून मी खरोखरच कृतज्ञ आहे असे फराहचे म्हणणे आहे. फराहने एका निवेदनात म्हटले आहे की, "आज काही जोडप्यांना विविध कारणांमुळे गर्भधारणा होणे कठीण आहे परंतु आमच्याकडे उपायांच्या रूपात पर्याय उपलब्ध झाला आहेत."
बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर देखील सरोगसीचा पर्याय निवडल्यानंतर जुळ्या मुलांचा (यश आणि रुही) पिता झाला. फेब्रुवारी 2017 मध्ये या जुळ्या मुलांचा जन्म झाला.
बॉलीवूड अभिनेत्री लिसा रे आणि तिचा पती जेसन डेहनी यांनी जून 2018 मध्ये सरोगसीद्वारे त्यांच्या जुळ्या मुलींचे (सूफी आणि सोलील) स्वागत केले.
बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने सोशल मीडियावर माहिती दिली की ती आणि तिचा पती जीन गुडइनफ सरोगसीद्वारे जुळ्या मुलांचे (एक मुलगा आणि एक मुलगी) पालक झाले आहेत. मोठ्या पडद्यापासून दूर राहिलेल्या झिंटाने सांगितले की, तिने आपल्या मुलांची नाव जय आणि जिया ठेवले आहेत.
आमिर खान आणि किरण राव यांनी 2011 मध्ये IVF च्या माध्यमातून त्यांचा मुलगा आझादचे स्वागत केले. गेल्या वर्षी आमिर खान आणि किरण राव यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.
पहिल्या मुलाच्या (निर्वाण) जन्मानंतर दहा वर्षांनी सीमा आणि सोहेल खान यांनी दुसऱ्या मूलचा निर्णय घेतला. जेव्हा हे नैसर्गिकरित्या होऊ शकत नाही तेव्हा त्यांना वैद्यकीय मदत घ्यावी लागली आणि IVF सरोगसीचा पर्याय निवडला. त्यांच्या लग्नाच्या जवळपास 13 वर्षांनी जून 2011 मध्ये त्यांचे दुसरे अपत्य योहानचा जन्म झाला. रिपोर्टनुसार, त्याने शाहरुख खान आणि गौरी खानलाही सरोगसीचा पर्याय निवडण्यास सांगितले होते.
श्रेयस तळपदे आणि त्याची पत्नी दीप्ती मे 2018 मध्ये सरोगसीद्वारे पालक बनले. या जोडप्याने आपल्या मुलीचे नाव आद्या ठेवले आहे. या जोडप्याने लग्नाच्या 14 वर्षानंतर सरोगसीचा पर्याय निवडला.