अजित पवार यांच्याविषयी नाना पाटेकर असं काय म्हणाले? ज्याची होतेय एकच चर्चा

ज्याची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे.

Updated: Jan 22, 2022, 05:29 PM IST
 अजित पवार यांच्याविषयी नाना पाटेकर असं काय म्हणाले? ज्याची होतेय एकच चर्चा title=

पुणे : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर नेहमीच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात, ते आपलं मत रोखठोक पणे मांडताना दिसतात. अनेक सामाजिक कार्यांमध्ये काम करत असताना ते राजकारणाविषयी देखील बोलताना दिसतात. 
नुकतंच ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल बोलले, ज्याची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे.

'उपमुख्यमंत्री अजित पवार हे शांत राहून काम करत असतात. एखादी गोष्ट चुकली तर तेवढीच अधोरेखित होते. पण, त्यांनी केलेलं काम समोर आणलं पाहिजे, ते खरंच चांगले नेते आहेत. अजित पवार जेवढी कामं करतात त्याची जाहिरात कधीच करत नाहीत, असं अभिनेते नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.

नाना पाटेकरांनी अजित पवार यांच्या कामाची स्तुती केली.

पुढे नाना पाटेकर म्हणाले, 'आम्हाला अधिक प्रसिद्धी मिळते. पण राजकारणी लोकांनी केलेल्या कामाला प्रसिद्धी मिळत नाही. पक्ष बदलणाऱ्या माणसाला पाच वर्षे कोणतेही पद देऊ नका. म्हणजे कोणीही पक्ष बदलणार नाही. पक्ष बदलला त्यावर काहीतरी नियम असायला पाहिजेत. किमान शिक्षणाची तरी अट पाहिजे."

नाना पाटेकर अमोल कोल्हे यांच्याबद्दल काय बोलले?

यावेळी नाना पाटेकर यांच्याकडून खासदार अमोल कोल्हे यांची पाठराखण करण्यात आली. नाना म्हणाले, 'अमोल कोल्हे हे अभिनेते आहेत, त्यांनी कोणती भूमिका करायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असून तीस वर्षांपूर्वी मी सुद्धा नथूराम गोडसेची भूमिका केली आहे. मी भूमिका केली म्हणजे मी त्यांचं समर्थन करत नाही. 

पुढे नाना म्हणाले, 'मी गोडसेची भूमिका का केली, ते माझं उपजीविकेचे साधन आहे, यात माझी काय चूक आहे? असा प्रश्न उपस्थित करत नाना पाटेकर म्हणाले, प्रत्येक गोष्टीचं भांडवल करायची गरज नाही. शिवाजी महाराजांची भूमिका केली त्यावेळी तुम्ही त्यांना का विचारले नाही, ही भूमिका का केली? त्यावेळी कलाकार म्हणून कोल्हे यांना मान्य केलं. मग आता का नाकारत आहात? असा प्रश्न नाना पाटेकर यांनी यावेळी उपस्थित केला. 

एकूणच काय तर यावेळी नाना पाटेकर यांनी सुरु असलेल्या राजकीय घडामोडींबाबत आपली भूमिका मांडली.