मुंबई : टीव्हीचा सर्वात वादग्रस्त शो 'Bigg Boss 13' सीझन आतापर्यंतचा सर्वात हिट शो मानला जातो. टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने या शोवर वर्चस्व गाजवले. या शोमधून त्याला इतकी लोकप्रियता मिळाली की, तो प्रत्येकाच्या हृदयात घर करून गेला. पण आता सिद्धार्थ शुक्ल या जगात नाही. 2 सप्टेंबर रोजी वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले.
या बातमीने त्याचे चाहत्यांना धक्का बसला आहेत. अनेक स्टार्सनी बिग बॉस मधून नाव कमावले पण काही असे ही स्पर्धक होते, ज्यांनी हे जग फार कमी वयात सोडले.
यामध्ये अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीचे देखील नाव आहे. प्रत्युषा बिग बॉस 7 चा भाग होती. वर्ष 2016 मध्ये तिने आपल्या राहात्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. योगायोग असा की, प्रत्युषा आणि सिद्धार्थ दोघेही कलर्सच्या लोकप्रिय शो 'बालिका वधू' मध्ये मुख्य भूमिकेत होते.
स्वामी ओम बिग बॉस 10 चे स्पर्धक होते. त्यांनी या शोमध्ये खूप गोंधळ घातला. त्यांच्या कृत्यांमुळे, ते शोचा सर्वात वादग्रस्त स्पर्धक बनले. स्वामी ओम यांना पॅरालाइज झाले होते. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
अभिनेता सोमनाथ चिटनूर (Somdas Chathannoor) देखील या जगात नाही. सोमनाथ बिग बॉस मल्याळमचा एक भाग होता. कोरोनामुळे त्याने हे जग सोडले.
इंटरनेशनल सेलेब्रिटी जेड गुडी (Jade Goody) बिग बॉसच्या सीझन 2 मध्ये दिसली. या शोआधी ती बिग ब्रदरचाही एक भाग होती. जेड गुडीला कॅन्सर झाला होता, त्यानंतर तिचा 2008 मध्ये मृत्यू झाला.
बिग बॉस कन्नडचा भाग असलेल्या अभिनेत्री जयश्री रमैयानेही (Jayashree Ramaiah) यावर्षी आत्महत्या केली. रिपोर्ट्सनुसार, ती बऱ्याच काळापासून डिप्रेशनमध्ये होती.