Rekha किंवा Zeenat Aman नाही, तर 'या' अभिनेत्रीचे दिवाने होते Amiabh Bachchan , नंतर झाला पश्चाताप

'कौन बनेगा करोडपती 16' च्या एका एपिसोडमध्ये, होस्ट अमिताभ बच्चन त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीबद्दल बोलले.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 20, 2024, 12:47 PM IST
Rekha किंवा Zeenat Aman नाही, तर 'या' अभिनेत्रीचे दिवाने होते Amiabh Bachchan , नंतर झाला पश्चाताप

'कौन बनेगा करोडपती' च्या एका एपिसोडमध्ये होस्ट अमिताभ बच्चन यांनी आपल्या करिअरबद्दल गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी आपल्या करिअरबद्दल देखील अतिशय मोकळेपणाने बोलले. यावेळी अमिताभ यांनी आपल्याला आडत असलेल्या अभिनेत्रीच्या नावाचा खुलासा केला आहे. ज्याबाबत आजही त्यांना पश्चाताप होतोय. 

Add Zee News as a Preferred Source

बिग बी केबीसीमध्ये यावेळी दिग्गज अभिनेत्री मीना कुमारीबद्दल बोलत होते. यासोबतच बिग बींना ‘प्यासा’ चित्रपटातील अभिनेत्री वहिदा रहमानचा प्रसिद्ध सीन आठवला. ज्या सीनचा परिणाम अमिताभ बच्चन यांच्यावर खोलवर पडला. विद्या बालन आणि कार्तिक आर्यन यांच्याशी संवाद साधताना अमिताभ यांनी 1962 मधील प्रसिद्ध चित्रपट साहिब बीबी और गुलामबद्दल बोलले आणि मीना कुमारीसोबत काम करू न शकल्याबद्दल खंत व्यक्त केली.

मीना कुमारी यांच्यासोबत काम करण्याची संधी मला कधीच मिळाली नाही, असे बिग बी म्हणाले. साहिब बीबी और गुलाममध्ये एक गाणे आहे, ना जाओ सैयां, जे त्यांनी अतिशय सुंदरपणे सादर केले आहे. मी ते गाणं आजही अनेकदा ऐकतो. 

शूटिंगबद्दल काय म्हणाले?

अमिताभ बच्चन पुढे म्हणाले की, “ त्यावेळी दिग्दर्शक लाँग शॉट्स घेत असत आणि मला असे वाटायचे की, हेच या सिनेमांचे वेगळेपण आहे.  तर आजचे शॉट्स एक दोन शब्दातच संपून जातात.  पुढे ते म्हणाले की, वहिदा रहमान जी, त्या माझ्या आवडत्या अभिनेत्री आहेत." अमिताभ पुढे म्हणाले, "किती सुंदर शॉट होता, तो क्लोज अप करण्यासाठी दोन किंवा तीन वेळा तसं करावं लागलं. आजकाल सगळंच पटकन होतं, पण तेव्हा तसं नव्हतं.

बिग बींच्या या गोष्टींनी विद्या बालनला आश्चर्याचा धक्का बसला. यावर अभिनेत्री म्हणाली, "मला त्या काळात जन्म घेऊन तुमची अभिनेत्री व्हायला आवडले असते." यानंतर कार्तिक म्हणाला, "सर, मलाही तुमची नायिका व्हायला आवडेल. कार्तिक आर्यन आणि विद्या बालनचा 'भूल भुलैया' हा चित्रपट 1 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More