महिला खासदाराचं पुन्हा बोल्ड फोटोशुट, फोटो पाहून चाहते थक्क

महिला खासदाराच्या फोटोशुटची का होतेय चर्चा, तुम्ही फोटो पाहिलेत का? 

Updated: Jul 24, 2022, 07:23 PM IST
 महिला खासदाराचं पुन्हा बोल्ड फोटोशुट, फोटो पाहून चाहते थक्क title=

मुंबई : बंगाली चित्रपटाच्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ राजकीय वक्तव्यासह त्याच्या सौदर्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्या आपले फोटो पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. आता त्यांनी नवीन फोटोशुट शेअर केले आहेत. 

नुसरत जहाँ यांनी पुन्हा एकदा बोल्ड फोटोशुट केले आहे. या फोटोशुट मधले काही फोटो नुसरत यांनी त्यांच्या  इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. नुसरत यांचा हा बोल्ड लूक चाहत्यांना खुप आवडला आहे.  

फोटोंमध्ये नुसरत जहाँ काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन घातला आहे. हा गाऊन खूप घट्ट तर आहेच पण खूप खुलवणाराही आहे.विशेष म्हणजे नुसरत यांचा हा ड्रेसही अनेक ठिकाणाहून पारदर्शक आहे. ज्यामुळे तिचा लूक आणखीनच बोल्ड आणि किलर बनत आहे.नुसरतने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. या त्यांच्या फोटोवर आता लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.  

दरम्यान नुसरत यांनी सोशल मीडियावर असे फोटो शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही नुसरतने अनेकवेळा असे फोटो शेअर केले आहेत.