Nushratt Bharuchha : इस्त्राईलमध्ये सुरू असलेल्या युद्धांचे अख्ख्या जगात पडसाद उमटताना दिसत आहेत. त्यातून या युद्धाच्या पार्श्वभुमीवर बॉलिवूड अभिनेत्री नूसरत बरूचा हीदेखील अडकली होती. परंतु त्याच्या तीन दिवसांतच ती सुखरूप भारतात परत आली आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चा सूरू झाली होती. एअरपोर्टवरून तिनं आपल्या घरी जात होती तेव्हा मात्र तिच्या चेहऱ्यावर भीती आणि दु:ख हे पुरतं दिसत होतं. त्यामुळे तिची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. आता या सर्वातून सुखरूप परतल्यानंतर आणि आपल्याला सदम्यातून बाहेर आल्यानंतर नुसरत हिनं आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून एक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केला आहे. यावेळी तिनं या पोस्टमधून आपलं ऑफिशियल स्टेटमेंट लिहिलं आहे. ज्यात तिनं या सगळ्या घटनांचा उल्लेख करत त्यातून तिनं आपल्याला आलेल्या या भयावह अनुभवाचे वर्णन केले आहे.
तिच्या वर्णनावरून आपल्याला कळेल की ही परिस्थिती किती भयानक होती. सध्या तिच्या या पोस्टची सर्वत्र चर्चा आहे. तिनं एक व्हिडीओही शेअर केला आहे. ज्यातून तिनं म्हणलं आहे की, मी सुरक्षित आहे. सोबत भारतात खूप सुरक्षा आहे. आपल्या देशाशिवाय कुठेच इतकी सुरक्षा नाही. मी भारत सरकारचे आभार मानते. सध्या तिनं आपल्याला आलेल्या अनुभवांविषयी सविस्तरपणे लिहिले आहे. त्यात ती म्हणते की, 'आम्ही इस्त्राईलच्या टेलव्हिव हॉटेलमध्ये होतो तेव्हा अक्षरक्ष: विस्फोटांचे आणि बॉम्बब्लास्टिंगचा आवाज येऊ लागला आणि तेव्हा आम्ही सगळेच घाबरलो. तेव्हा आम्ही हॉटेलच्या बेसमेंटमध्ये होतो त्यातून आम्हालाही कळतं नव्हतं की हे काय होतंय? तेव्हा आम्हाला नंतर कळलं की, आमच्यावर युद्धाचे सावट आहे.
हेही वाचा : रश्मिका मंदानाचा रणबीरसोबतचा लिपलॉक नेटकऱ्यांना खटकला, म्हणाले, 'पैसे मिळतात म्हणून...!'
''गेला आठवडा माझ्या स्मरणात कायमचा कोरला जाईल... भावनांचा एक रोलरकोस्टर राईड, त्यातील शेवटचे 36 तास माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय आणि भयावह असतील. माझे निर्माता, स्टायलिस्ट आणि मला इस्रायलमधील हैफा येथे 3 ऑक्टोबर रोजी, आमच्या अलीकडील चित्रपट अकेलीच्या प्रदर्शनासाठी प्रतिष्ठित हैफा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी, माझे इस्रायली सहकलाकार, त्साही हालेवी आणि अमीर बौट्रोस यांच्यासमवेत नेण्यात आले होते. दोन दिवसांनी जेरुसलेम, जाफा, बहाई, डेड सी या इस्रायलच्या सर्व ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन, आम्ही शुक्रवारी रात्री, ऑक्टो 6 रोजी चित्रपटाच्या कलाकारांसाठी उत्सवपूर्ण डिनरसह आमची सहल जवळजवळ संपवली.''