Fukrey 3 Box Office Collection Worldwide : बॉलीवूडची लोकप्रिय फ्रेंचाइजी फुक्रेचा तिसरा भाग बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी 8.82 कोटी रुपयांची कमाई करणारा हा चित्रपट तिकीट खिडकीवर सतत आघाडीवर आहे आणि भरपूर कमाईही करत आहे.
'फुकरे 3' 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाला आहे
आता या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. पुलकित सम्राटचा चित्रपट आता १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरात लोकप्रिय झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे.
चित्रपटांच्या गर्दीतही सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आहे.
वरुण शर्मा, रिचा चढ्ढा, पुलकित सम्राट आणि पंकज त्रिपाठी यांच्या फुकरे गँगने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या 'फुकरे 3' या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर 'द वॅक्सीन वॉर', 'चंद्रमुखी 2', 'मिसिनी राणीगंज' आणि 'थँक्स फॉर कमिंग' या सगळ्या नवीन चित्रपटांना मागे टाकलं आहे. यासोबतच 'फुकरे 3'चे कलेक्शनही वाढत आहे.
बॉक्सऑफिस कलेक्शन
देशांतर्गत बॉक्स ऑफिसबद्दल बोलायचं झाल्यास, सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, 'फुकरे 3' ने दुसऱ्या सोमवारी म्हणजेच रिलीजच्या 12 व्या दिवशी 1.50 कोटी रुपये कमवले आहेत. यानंतर चित्रपटाची एकूण कमाई आता ७७.९६ कोटींवर पोहोचली आहे. नव्या चित्रपटांच्या गर्दीतही 'फुकरे ३'ने बॉक्स ऑफिसवर आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. रिलीजच्या 12 दिवसांतच चित्रपटाने 80 कोटींचा टप्पा पार केला आहे.
|
OMA
(19.5 ov) 103
|
VS |
ZIM
106/2(13.3 ov)
|
| Zimbabwe beat Oman by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SCO
(20 ov) 207/4
|
VS |
ITA
134(16.4 ov)
|
| Scotland beat Italy by 73 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SL
(20 ov) 163/6
|
VS |
IRE
143(19.5 ov)
|
| Sri Lanka beat Ireland by 20 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.