मुंबई : साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा या दिवसांत 'काथु वकुला रेंडु कधल', या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात विजय सेतुपति, नयनतारा आणि सामंथा रुथ प्रभुदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'काथु वकुला रेंडु कधल' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा सिनेमा एक तमिळ रोमँन्टिक कॉमेडी फिल्म असेल. ज्यामध्ये एका मुलाला एकाचवेळी दोन मुलींवर प्रेम होतं. ट्रेलर पाहून वाटतं की, हा एक कॉमेडी सिनेमा असेल. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये नयनतारा खूप सुंदर दिसत आहे.
अलीकडेच सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट मुनमुन गनेरीवाल यांनी खुलासा केला, "नयनतारा तिच्या फिटनेस आणि आहाराची विशेष काळजी घेते. ती क्युरेटेड डाएट फॉलो करते जे तिला विशिष्ट भूमिकेसाठी वजन कमी करण्यास किंवा वाढवण्यास मदत करते, त्याचबोरबर तिच्या सगळ्या पौष्टिक गरजा पूर्ण झाल्याची खात्री देखील करते.
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट मुनमुन गनेरीवाल म्हणते की, ही रेसिपी सेलिब्रिटींना खूप आवडते. गनेरीवाल यांच्या मते, नयनताराला नारळाच्या स्मूदीज आवडतात. नयनतारा या ड्रिंकच्या प्रेमात आहे जेव्हा मी पहिल्यांदा तिला ते प्यायला दिलं. तेव्हापासून ती हे ड्रिंक रोज पिते. कारण हे ड्रिंक बनवायला देखील खूप सोपं असल्याचं तिने सांगितलं.
यासाठी 2 कप नारळ पाणी घ्या, 1 कप - सॉफ्ट नारळाची साय आणि 1 कप – नारळ दूध आणि साखर घ्या . यात चिमुठभर दालचीनी पाउडर आणि इलायची पाउडर टाका. या सगळ्या मिश्रणाला चांगलं फेटाळून घ्या. गनेरीवाल म्हणाली कि, या स्मूदीमुळे नयनताराला हाइड्रेटेड राहण्यासाठी मदद मिळते.
न्यूट्रिशनिस्टकडून नयनताराच्या फिटनेसचं गुपित उघड, अभिनेत्री असं ठेवते स्वत:ला फिट