नवी दिल्ली : अभिनेता शाहरूख खान सध्या आगामी सिनेमा 'झिरो' च्या प्रमोशमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ दिसणार आहेत. दरम्यान शनिवारपासून शाहरूखच्या सुरक्षेत वाढ करण्यात करण्यात आली आहे. शाहरूख ओडिशा दौऱ्यावर असताना त्याच्यावर शाई फेकण्याची धमकी कलिंग सेनेने दिलीयं. आता या संघटनेचा आणि शाहरूखचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
27 नोव्हेंबरला शाहरूख खान कलिंगा स्टेडियममध्ये पुरूष हॉकी वर्ल्ड कपच्या उद्घाटनावेळी उपस्थित असणार आहे. त्यावेळी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात येणार असल्याचेही संघटनेतर्फे सांगण्यात येतंय.
हॉकी वर्ल्ड कपमध्ये शाहरूखच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल असे भुवनेश्वरचे डीसीपी अनूप साहू यांनी सांगितले.
अशोका सिनेमात ओडिशातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याने शाहरूखने माफी मागावी असं संघटनेचे प्रमुख हेमंत रथ यांनी सांगितले.
कलिंगला चुकीच्या पद्धतीने दाखवून राज्य संस्कृती आणि इथल्या लोकांचा अपमान केल्याचा आरोप संघटनेनं केलायं.
शाहरूखचा 'झिरो' सिनेमा 21 डिसेंबरला रिलीज होणार आहे. हिमांशु शर्मा लिखित या सिनेमाचे दिग्दर्शन आनंद एल.राय यांनी केलंय. आनंद यांनी याआधी 'तनु वेड्स मनु' आणि 'तनु वेड्स मनु रिटर्स' या हिट सिनेमांचं दिग्दर्शन केलंय.
17 वर्षांपूर्वी शाहरूख खानचा 'अशोका' नावाचा सिनेमा रिलीज झाला होता. यामध्ये इतिहासासोबत छेडछाड करण्यात आल्याचा आरोप संघटनेतर्फे करण्यात येतोयं. यामध्ये त्यांनी शाहरूखला आरोपी धरत त्याच्यावर शाई फेकण्याची धमकी दिलीयं.