Video Aishwarya Rai : मिस वर्ल्ड जिंकली तेव्हा अशी दिसायची ऐश्वर्या राय; अभिषेकचा तेव्हाचा फोटो पाहाल तर म्हणाल ...

Aishwarya Rai Bachchan viral photo : त्यावेळची ऐश्वर्या आणी आताची ऐश्वर्या यात किती बदल झालाय हे या फोटोंवरून स्पष्ट दिसत आहे शिवाय त्यावेळी अभिषेक कसा दिसत होता हे पाहिलं तर...

Updated: Feb 4, 2023, 11:36 AM IST
Video Aishwarya Rai : मिस वर्ल्ड जिंकली तेव्हा अशी दिसायची ऐश्वर्या राय; अभिषेकचा तेव्हाचा फोटो पाहाल तर म्हणाल ...

Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या राय बच्चन नाव घेतलं तर आपल्यासमोर काय येत तर, आरस्पानी सौंदर्याची खान असलेली अभिनेत्री, आपल्या बोलक्या आणि सुंदर डोळ्यांनी सर्वाना घायाळ करणारी ऐश...ऐश्वर्याने (Aishwarya Rai Bachchan) आपल्या सौंदर्याने आणि

अभिनयाने चाहत्यांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. आजही ऐश्वर्या तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.  19 नोव्हेंबर 1994 हा दिवस ऐश्वर्या आणि समस्त भारतीयांसाठी अत्यंत महत्वाचा आणि कधीही न विसरणार दिवस होता, भारताच्या या सौंदर्यवतीने जागतिक स्तरावर आपल्या सौंदर्याचा डंका वाजवला होता.  जवळपास 29 वर्षांपूर्वी  ऐश्वर्याने मिस वर्ल्ड (Aishwarya rai Miss World) हा 'किताब आपल्या नावे केला होता. आज या जुन्या आठवणींविषयी सांगण्याचं कारण म्हणजे सध्या सोशल मीडियावर 1994-95 च्या मिस वर्ल्ड स्पर्धेतील व्हिडीओ व्हायरल (video viral ) होत आहेत. 

या व्हिडिओमधील ऐश्वर्या आणि तिचा लुक (Aishwarya Rai Bachchan viral old video) पाहून चाहते पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पाले आहेत, या व्हिडिओला पुन्हा एकदा खूप पसंती मिळत आहे आणि लोक आवर्जून हे व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत.  29 वर्षांपूर्वीची ऐश पाहण्यासाठी हा व्हिडीओ वारंवार पहिला जात आहे. 

त्यावेळी ऐश्वर्या भारतीय आणि पाश्चात्य अश्या दोन्ही लूकमध्ये पाहायला मिळाली होती.  त्यावेळी ऐश्वर्याच्या चालण्या बोलण्यात कमालीचा साधेपणा दिसत होता.  मिस वर्ल्ड स्पर्धेत विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर तिने अतिशय चोखपणे दिली होती आणि या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होत. उपस्थितांना तिच्या सौंदर्योपासोबत हजारजबाबीपणाचीसुद्धा भुरळ पडली होती. 

सौंदर्यासोबत ऐश्वर्या हुशार देखील आहे हे तिने दाखवून दिल होतं. ज्यादिवशी ऐश्वर्याने मिस वर्ल्ड्सचा हिरेजडित मुकुट घातला त्यावेळी तीच वय होत दिघे 21  वर्ष.  या स्पर्धेत 86 देशांतील सौंदर्यवतींनी सहभाग नोंदवला होता. या सर्वाना हरवून ऐश्वर्या त्यावेळची जागतिक सुंदरी ठरली होती. 

ऐश्वर्यानंतर अनेक भारतीय सुंदरींनी हा 'किताब जिंकला मात्र आजही ऐश्वर्याच्या सुंदरतेचा आणि तिच्या चर्चांमध्ये काहीही कमी झालेली नाहीये. 

मिस वर्ल्ड जिंकल्यानंतर ऐश्वर्यापुढे बॉलिवूड मधून चित्रपटांची रंग लागू लागली. अनेक सिनेमामध्ये तिने काम केलं आणि अभिनयाच्या जोरावर पुन्हा एकदा रसिकप्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरवात केली. आजही तिच्या सौंदर्याची मोहिनी प्रेक्षकांवर तशीच आहे. 

ज्यावेळी ऐश्वर्या मिस वर्ल्ड जिंकली त्यावेळी अभिषेक बच्चन कसा दिसायचा माहिती आहे? 

ऐश्वर्याने 2007 मध्ये अभिषेक बच्चन सोबत लग्नगाठ बांधली. आज त्यांची जोडी लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. अनेक पार्टी आणि इव्हेंट्समध्ये दोघे एकत्र दिसतात. पण तुम्हाला माहित आहे का, ?  जेव्हा ऐश्वर्याने मिस वर्ल्ड (Aishwarya Rai Bachchan miss world) चा 'किताब पटकवला तेव्हा अभिषेक केवढा होता आणि कसा दिसायचा...

हा फोटो 1994 मधला असल्याचं सांगितलं जात आहे. याच वर्षात ऐश्वर्या रॉय मिस वर्ल्ड (Miss World) बनली होती. त्यावेळी अभिषेक बच्चन कसा दिसत होता याची उत्सुकता चाहत्यांना आहे. या फोटोत अभिषेक आपले वडिल आणि बॉलीवूडचे बीग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसत आहे. या फोटोमध्ये अभिषेक बच्चन अगदी साध्या पेहरावात दिसत आहे.