OMG 2 Trailer: अक्षयचा रोल बदलला, महादेव नव्हे तर शिवदूत! ट्रेलरमध्ये झाला खुलासा

OMG-2 Trailer Launch:  अक्षय कुमारचा OMG-2 चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.  

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 3, 2023, 12:52 PM IST
OMG 2 Trailer: अक्षयचा रोल बदलला, महादेव नव्हे तर शिवदूत! ट्रेलरमध्ये झाला खुलासा title=
OMG 2 trailer released Akshay Kumar plays messenger of Lord Shiva as Pankaj Tripathi Yami Gautami in lead Role watch Now

OMG-2 Trailer Launch: बहुप्रतीक्षीत आणि बहुचर्चित OMG-2चा ट्रेलर आज अखेर रिलीज करण्यात आला आहे. अक्षय कुमारची (Akshay Kumar) मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होता. हा चित्रपट काही वर्षांपूर्वी आलेल्या OMG चित्रपटाचा दुसरा भाग आहे. 11 ऑगस्ट 2023मध्ये हा चित्रपट प्रदर्षित होणार आहे. खरं तर 2 ऑगस्ट रोजी या चित्रपटाचा ट्रेलर लाँच होणार होता. मात्र कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळं ट्रेलर लाँचची तारिख पुढे ढकलण्यात आली होती. (Akshay Kumar OMG-2 Trailer Launch)

11 ऑगस्ट रोजी सनी देओलच्या गदर-२सोबत अक्षय कुमारचा OMG-2 रिलीज होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत पंकज त्रिपाठी, यामी गोतम आणि अरुण गोविल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर आज ११च्या सुमारास लाँच करण्यात आला आहे. ओएमजी-2 चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शक अमित राय यांनी केले आहे. ओएमीजी-2 चित्रपटाची कहाणी ही भगवान महादेवाचा कट्टर भक्त कांती शरण मुद्गगल यांच्याभोवती फिरते. 

ट्रेलर लाँच

एका सर्वसामान्य कुटुंबातील कांतीशरण एका मोठ्या समस्येत अडकतो त्याच्या परिवाराचे रक्षण करण्यासाठी महादेव रक्षणासाठी येतात, अशी चित्रपटाची कथा आहे. कांतीशरण मुद्गगल यांचा मुलगा विवेकवर अनैतिक वर्तनाचा आरोप केला जातो. त्यामुळं त्याला शाळेतून काढून टाकण्यात येते. मुलाच्या वर्तनामुळं अडचणीत सापडलेले कांती शहर सोडण्याचा निर्णय घेतात. त्याचवेळी अक्षय कुमार त्यांना त्यापासून परावृत्त करतो व खऱ्या मार्गावर चालण्याचा सल्ला देतो. त्यानंतर कांती सर्वांना कोर्टात खेचतात. मात्र कांती मुलाला न्याय मिळवून देतील का? ते केस जिंकतील का? हे सर्व तुम्हाला चित्रपटातच पाहायला मिळणार आहे. 

बॉक्स ऑफिसवर होणार क्लॅश

बॉक्स ऑफिसवर या महिन्यात दोन मोठ्या कलाकारांच्या चित्रपट क्लॅश होणार आहेत. अक्षयचा चित्रपट सनी देओल आणि अमीषा पटेलच्या गदर-2सोबत क्लॅश होणार आहे. गदर-2ला अनिल शर्मा यांनी दिग्दर्शित केले असून 2001मध्ये आलेल्या गदर एक प्रेम कथाचा हा ट्रेलर आहे. त्यामुळं आता अक्षय आणि सनी या दोघांमध्ये बॉक्स ऑफिसवर कोणाची जादू चालेल हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.