कपिल शर्माने पुन्हा कॅन्सल केला शो, 'या' स्टारला जावं लागल माघारी

कॉमेडी किंग कपिल शर्मा २५ मार्चपासून सर्वांना हसविण्यास येतोय. सोनी टीव्हीवर 'फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा' मधून तो खूप मोठ्या काळानंतर पुनरागमन करतोय. पण हा शो सुरू होण्याआधीच तो शुटींग रद्द करण्याच्या विषयावरून पुन्हा चर्चेत आलाय.

Updated: Mar 23, 2018, 11:17 AM IST
कपिल शर्माने पुन्हा कॅन्सल केला शो, 'या' स्टारला जावं लागल माघारी  title=

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा २५ मार्चपासून सर्वांना हसविण्यास येतोय. सोनी टीव्हीवर 'फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा' मधून तो खूप मोठ्या काळानंतर पुनरागमन करतोय. पण हा शो सुरू होण्याआधीच तो शुटींग रद्द करण्याच्या विषयावरून पुन्हा चर्चेत आलाय.

टायगर श्रॉफ रद्द 

 'हॅरिपोर्ट्स' ने दिलेल्या वृत्तानुसार, कपिलने यावेळेस टायगर श्रॉफसोबत शुटींग कॅन्सल केली आहे. 'शो' च्या पहिल्यादिवशी अजय देवगण दिसणार आहे. अजयच्या एपिसोडची शुटींग पूर्ण झाली आहे. तर दुसऱ्या एपिसोडमध्ये टायगर श्रॉफ दिसणार आहे. पण टायगरची शुटींग तर रद्द करण्यात आलीए.  

स्टार्स गेले माघारी 

'द कपिल शर्मा शो' मध्ये कपिलची तब्ब्येत वारंवार बिघडल्याने शाहरुख खान, अजय देवगण सारखे स्टार्स शुटींग सोडून माघारी गेले होते.
 
कपिलची तब्येत किंवा वैयक्तिक अस शुटींग रद्द करण्याच कारण नाहीए. तर काही टेक्निकल कारणामुळे हे शुट रद्द करावे लागले आहे. 

घर आणि कार मिळणार 

 शो च्या पहिल्या भागात कपिल आपल्या कॉमेडीने सर्वांना हसवेल आणि खेळही खेळेल. या खेळात जो जिंकेल त्याला खूप साऱ्या वस्तू दिल्या जातील.

या गिफ्ट्समध्ये घरासोबत कारही देण्यात येईल. कपिलचा हा शो 'द हॉलिवूड स्केअर' शो पासून प्रेरित आहे.