कतरिना-विकीचं लग्न, पण सलमानचा वेगळाचं प्लान

खास मैत्रिणीच्या लग्नात भाईजानने का केला वेगळा प्लान? 

Updated: Dec 7, 2021, 08:59 AM IST
कतरिना-विकीचं लग्न, पण सलमानचा वेगळाचं प्लान

मुंबई :  सध्या सर्वत्र अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशलच्या लग्नाची चर्चा रंगत आहे. सोमवारी विकी आणि कतरिना कुटुंबासोबत जयपूरला रवाना झाले. त्यामुळे येत्या 9 तारखेला विकी आणि कतरिना सप्तपदी घेणार यात काही शंकाचं नाही. फार कमी लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडणार आहे. पण विवाह सोहळ्याला कोण-कोण हजेरी लावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुख्य म्हणजे सलमान येणार का? असा प्रश्न सर्व चाहत्यांना पडला आहे.

सलमान आणि कतरिना अत्यंत चांगले मित्र असले तरी भईजान कतरिनाच्या लग्नात उपस्थित  राहणार नासल्याचं कळत आहे. महत्त्वाचं म्हणजे कतरिनाच्या लग्नात सिक्युरिटी पुरवण्याची जबाबदारी सलमानचा बॉडीगार्ड शेराच्या (Salman Khan's bodyguard Shera) खांद्यावर असताना शेरा आणि सलमान दोघेही लग्नात उपस्थित राहणार नाहीत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रिपोर्ट्सनुसार, शेराची सुरक्षा कंपनी 'टायगर सिक्युरिटी' सिक्स सेन्स फोर्टच्या संरक्षणासाठी आहे. सलमान कतरिनाच्या लग्नाला हजेरी लावू शकतो, अशी चर्चा होती. मात्र नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत बहीण अर्पिता खान शर्माने कुटुंबाला लग्नाचे निमंत्रण दिले नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. 

पण आता पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहे की, सलमान खास मैत्रीण कतरिनाच्या लग्नाला हजेरी लावणार का? तर असं होण्याची शक्यता फार कमी आहे. एका वेबसाईटच्या रिपोर्टनुसार10 डिसेंबरपासून सलमान रियाधमध्ये त्याच्या आगामी 'दबंग 3'साठी परफॉर्म करणार आहे. 

यामुळे सलमान आणि बॉडीगार्ड शेरा रियाधमध्ये असणार आहेत. म्हणून सलमान, कतरिना आणि विकी कौशलच्या लग्नाला उपस्थित राहू शकणार नाही. पण तो लग्नात उपस्थित राहू शकणार नसला तरी लग्ना पूर्वीच्या विधींना हजेरी लावू शकतो.