१८ वर्षापुढील प्रेक्षकांनाच पाहता येणार सनीचा हा सिनेमा

भारतात असे खूप कमी वेळा होतं की एखादा चित्रपट हा लहान मुलांना दाखवण्यास मनाई असते. आतापर्यंत असे काही मोजकेच सिनेमे प्रदर्शित झाले आहेत.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Nov 24, 2017, 01:28 PM IST
१८ वर्षापुढील प्रेक्षकांनाच पाहता येणार सनीचा हा सिनेमा title=

मुंबई : भारतात असे खूप कमी वेळा होतं की एखादा चित्रपट हा लहान मुलांना दाखवण्यास मनाई असते. आतापर्यंत असे काही मोजकेच सिनेमे प्रदर्शित झाले आहेत.

१८ वर्षापुढील प्रेक्षकांना एन्ट्री

सनी लिऑनचा चित्रपट 'तेरा इंतजार' 24 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुण पुरुषांना आणि मुलींना हा पाहता येणार नाही. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला ए प्रमाणपत्र दिलं आहे. याचा अर्थ केवळ प्रौढांसाठीच हा सिनेमा आहे. 

सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांनी हा चित्रपट पाहिला. फक्त 18 वर्षे आणि त्यापेक्षा मोठ्या व्यक्तींनाच थिएटरमध्ये हा सिनेमा पाहण्यासाठी एन्ट्री मिळणार आहे.

बोल्ड सीनमुळे सेन्सॉर बोर्डाचा निर्णय

सेन्सॉर बोर्डाने कोणताही सीन कट न करता चित्रपटाला हिरवा कंदील दिला आहे. पण निर्मात्यांना याकरिता यू / ए प्रमाणपत्र हवं होते. त्यामुळे अधिकाधिक प्रेक्षक हा चित्रपट पाहू शकतील. सेन्सॉर बोर्डाने म्हटले आहे की, जर चित्रपटाला यू / ए प्रमाणपत्र देण्यात आले तर काही सीन कापावे लागतील.

चित्रपटाचे राईट्स विकले गेले आहेत. सिनेमातून हे बोल्ड सीन काढून टाकले तर सिनेमात काही अर्थ नाही राहणार असं निर्मात्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांना ए प्रमाणपत्रावर समाधान मानावं लागलं.