भारतीय स्वरावर का जळतायत पाकिस्तानी?

स्वरा भास्करची सरड्यासोबत का केली तुलना? 

भारतीय स्वरावर का जळतायत पाकिस्तानी?

मुंबई : कधी काळी पाकिस्तानचं भरभरून कौतुक करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करचे सूर बदलले आहेत. स्वरा भास्करने पाकिस्तानवर टीका केली आहे. एवढंच नव्हे तर पाकिस्तानला स्वरा भास्करने सल्ला देखील दिला आहे. पाकिस्तानमध्ये ''वीरे दी वेडिंग'' या सिनेमाला देखील बंदी केली आहे. 

या कारणामुळे पाकिस्तानवर केली टीका 

याचं कारण आहे 'वीरे दी वेडिंग'' या सिनेमाला पाकिस्तानमध्ये बॅन केलं आहे. सिनेमाला बॅन करण्यावरून स्वरा इतकी भडकली की, तिने पाकिस्तानला ''अविकसित देश'' असं संबोधलं आहे. एवढ्यावरच स्वरा थांबली नाही तर तिने पाकिस्तानला शरिया कानूनद्वारे चालवलं जात असल्याचं देखील तिने म्हटलं आहे. 

चाहत्यांनी स्वरा भास्करला का म्हटलं सरडा?

मात्र स्वरा भास्करच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावरून सडेतोड टीका होत आहे. युझर्सने स्वरा भास्करवर टीका करताना तिची तुलना चक्क सरड्यासोबत केली आहे. स्वरा भास्कर जेव्हा पाकिस्तानमध्ये गेली होती, तेव्हा तिने एका मुलाखतीत पाकिस्तानचं भरभरून कौतुक केलं होतं. पण आता वीरे दी वेडिंग या सिनेमाला विरोध केल्यामुळे स्वरा भास्कर आपलं मत बदलून पाकिस्तानवर टीका केली आहे. 

स्वरा भास्कर आपल्या सडेतोड बोलण्यामुळे ओळखली जाते. आणि आपल्या याच बोलण्यामुळे तिच्यावर अनेकदा टीका देखील झाली आहे. वीरे दी वेडिंग या सिनेमांत वल्गर कंटेट असल्याच म्हणतं पाकिस्तानमध्ये हा सिनेमा बॅन करण्यात आला आहे. स्वरा भास्करने पाकिस्तानबाबत बोलताना म्हटलं की, पाकिस्तान धर्मनिरपेक्ष देश असून त्याने बॉलिवूडच्या सिनेमांमध्ये हस्तक्षेप करू नये असा देखील सल्ला दिला आहे.