Body transformation : बऱ्याचदा शरीरात होणारे बदल अनेकदा एखाद्या व्यक्तीसाठी आव्हानात्मक ठरतात. काहींवर त्याचे सकारात्मक परिणाम होतात, तर काहींसाठी बदललेलं शरीर स्वीकारणं कठीण होऊन बसतं. अशाच Transformation चा सामना एका अभिनेत्री, मॉडेलनं केला. तिच्या पोस्ट पाहताना दिसणारा फरक लक्षात येताच तुम्हीही विचाराल, ही तिच आहे ना?
सध्या चर्चेत असणारा हा चेहरा आहे (Pakistan Model) पाकिस्तानी मॉडेल अयान अलीचा. आजकाल अयान तिच्या बदललेल्या रुपामुळं प्रकाशझोतात आली आहे. सर्वकाही व्यवस्थित सुरु असताना 2015 मध्ये अयानच्या आयुष्यात एक संकट ओढावलं. 14 मार्च 2015 मध्ये मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाअंतर्गत तिला अटक करण्यात आली होती. यादरम्यान तिला रावळपिंडी येथील अदियाला कारागृहात (Jail) तिची रवानगी करण्यात आली होती.
मनी लॉन्ड्रिंग (Money laundring) प्रकरणात अयानला वाईट पद्धतीनं अडचणीत टाकलं होतं. ज्यामुळं तिला नैराश्याचा सामना करावा लागला होता. (Depression) तणाव इतका वाढत गेला की तिचं वजन 90 किलोंवर पोहोचलं. दरम्यानच्या काळात तिला Heart Attack सुद्धा आला. रुग्णालयात उपचार घेत असताना अयानचं वजन पुन्हा 10 किलोंनी वाढलं. वजनाचा आकडा वाढतच चालला होता.
आपल्या शरीरात होणारे हे बदल पाहून अयानही हैराण होती. पण, शेवटी तिनं यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 4 ते 6 महिन्यांमध्ये तिनं 40 किलो वजन कमी केलं. अतिशय जिद्दीनं तिनं स्वत:वर मेहनत घेण्यास सुरुवात केली आणि त्याचे परिणामही दिसले (transformation). एकदा का तुम्ही निर्धार केला, की कोणीही तुम्हाला अडवू किंवा थांबवू शकत नाही हेच अयाननं दाखवून दिलं.