Palak Tiwari 'या' सिनेमातून करणार Bollywood Debut, बड्या अभिनेत्यासोबत झळकणार

Palak Tiwari Debut Movie: सलमान खान नव्हे तर या अभिनेत्याने दिला पलक तिवारीला ब्रेक, 'या' बॉलिवूड सिनेमात झळकणार 

Updated: Nov 22, 2022, 07:27 PM IST
Palak Tiwari 'या' सिनेमातून करणार Bollywood Debut, बड्या अभिनेत्यासोबत झळकणार  title=

Palak Tiwari Debut Movie: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिची मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. या फोटोंसोबत पलक तिवारीच्या बॉलिवूड डेब्यूची गेल्या खुप दिवसांपासून चर्चा होती. अखेर या चर्चांना आता पुर्णविराम मिळणार आहे. कारण आता पलक तिवारीने (Palak Tiwari Debut Movie) सोशल मीडियावर बॉलिवूडमधून डेब्यू करणाऱ्या चित्रपटाची माहिती दिली आहे. त्यामुळे हा चित्रपट नेमका कोणता असणार आहे, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. 

पलक तिवारी (Palak Tiwari) सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहायचा प्रयत्न करत असते. तसेच ती बॉलिवूडमध्ये डेब्यू (Palak Tiwari Debut Movie) करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून रंगली होती. या चर्चांना आता पुर्णविराम मिळणार आहे. कारण आता तिच्या बॉलिवूडमध्ये डेब्यू करणाऱ्या सिनेमाचे नाव समोर आले आहे.पलक तिवारीने स्वत: पोस्ट करून या डेब्यू सिनेमाबाबतची माहिती दिली आहे.  

पोस्टमध्ये काय?

पलक तिवारीने (Palak Tiwari photo) तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो तिच्या डेब्यू सिनेमाबाबतचे आहेत. या फोटोमध्ये तिच्या हातात क्लॅप बोर्ड आहे. तसेच इतर फोटोत ती तिच्या इतर कलाकारासोबत दिसत आहे. 

सिनेमाचं नाव काय? 

पलक तिवारी (Palak Tiwari) 'द व्हर्जिन ट्री' (The Virgin Tree) सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. बॉलिवूड अभिनेता संजय दत्त या चित्रपटाची निर्मिती करत आहे. या सिनेमात पलकसोबत अभिनेता सनी सिंह (Sunny Singh) देखील दिसणार आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट असणार आहे. या चित्रपटाच्या शुटींगला सुरूवात झाली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून ती सलमान खानच्या (Salmaan Khan) 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसणार असल्याच्या बातम्या येत होत्या.  पण याबाबत अधिकृत घोषणा झाली नव्हती. मात्र आता पलकने स्वतः तिच्या पहिल्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची कथा काय असणार आहे? पलक (Palak Tiwari) यात कोणती भूमिका साकारणार आहे? याबाबतची कोणतीही माहिती अद्याप मिळाली नाही आहे. मात्र या चित्रपटाची आता प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.