Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीने राज कुंद्रासोबत शेअर केला रोमँटिक Video, म्हणाली "तू मी आणि फक्त..."

Shilpa Shetty,Raj Kundra: शिल्पा आणि राज यांनी 22 नोव्हेंबर 2009 रोजी लग्नगाठ बांधली होती. या खास प्रसंगी (Shilpa Shetty Raj Kundra Wedding Anniversary) राज कुंद्राला शुभेच्छा देताना शिल्पा शेट्टीने एक अतिशय सुंदर व्हिडीओ शेअर केलाय.

Updated: Nov 22, 2022, 06:42 PM IST
Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीने राज कुंद्रासोबत शेअर केला रोमँटिक Video, म्हणाली "तू मी आणि फक्त..." title=
Shilpa Shetty,Raj Kundra

Shilpa Shetty Raj Kundra Wedding Anniversary: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा (Raj Kundra) ही जोडी म्हणजे बॉलिवूडमधील क्यूट कपल. अनेक मोठ्या संकटात दोघांनी एकमेकांची साथ सोडली नाही. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या लग्नाला 13 वर्षे पूर्ण झाली (Wedding Anniversary) आहेत. या निमित्ताने शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty Instagram) एक खास व्हिडीओ शेअर केला. तसेच त्यांनी रोमँटिक मॅसेज देखील लिहिला आहे.

शिल्पा आणि राज यांनी 22 नोव्हेंबर 2009 रोजी लग्नगाठ बांधली होती. या खास प्रसंगी (Shilpa Shetty Raj Kundra Wedding Anniversary) राज कुंद्राला शुभेच्छा देताना शिल्पा शेट्टीने एक अतिशय सुंदर व्हिडीओ शेअर केलाय. शिल्पा शेट्टीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर (Shilpa Shetty Share Video) केला आहे, ज्यामध्ये ती आणि राज कुंद्रा एकत्र दिसत आहेत.

आणखी वाचा - अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; जाणून चाहत्यांना धक्का

काय म्हणाली Shilpa Shetty?

तेरा वर्ष पुर्ण झाली कुकी... आणि अजूनही चालू आहे. या आयुष्यातील हा प्रवास माझ्यासोबत शेअर केल्याबद्दल आणि तो इतका सुंदर बनवल्याबद्दल थँक्यू. तू, मी, आम्ही फक्त... एवढीच गरज आहे. आपल्याला Happy Anniversary...Cookie, असं ती कॅप्शनमध्ये म्हणाली आहे.

पाहा Video -

दरम्यान, शिल्पाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून (loved up video) पती राज कुंद्रासोबतच्या (Shilpa Shetty) त्या दोघांच्या रोमँटिक फोटोंचा व्हिडिओ कोलाज शेअर केलाय. यामध्ये दोघे फिरायले गेले होते. त्यावेळीचे फोटो दिसत आहे. यामध्ये आयफिल टॉवरचा देखील फोटो आहे. पोर्नोग्राफी कंटेंट (Pornography Content) प्रकरणात राज कुंद्रा अडचणीत सापडला होता. त्यावेळी शिल्पा शेट्टीने राज कुंद्राला मोलाची साथ दिली होती.