Palak Tiwari : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) लेक पलक तिवारी (Palak Tiwari) ही चर्चेत असते. पलकला या क्षेत्रात पहिली ओळख ही बिजली बिजली या गाण्यातून मिळाली आहे. आता सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटातून पलकनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. पलक ही इंडस्ट्रीमध्ये असलेल्या स्टारकिड्सपैकी एक आहे. सोशल मीडियावर पलकचे लाखो चाहते आहेत. दरम्यान, पलक ही नेहमीच तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत असते. या सगळ्यात नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पलकनं तिचं तिच्या आईवर असलेलं एक तरफी प्रेमाविषयी सांगितलं आहे.
पलकनं नुकतीच Mid-Day ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत पलकनं सलमानसोबत स्क्रिन शेअर करण्यापासून श्वेता तिवारीविषयी काही गोष्टींचा खुलासा केला आहे. पलक तिच्या आईविषयी बोलताना म्हणाली, मी सलमान सरांच्या चित्रपटात काम करते याची जाणीव तिला झाली नसती तर तिनं माझ्यावर आणखी लक्ष ठेवलं असतं. पण जेव्हा तिला कळलं की मी सलमान सरांच्या चित्रपटात काम करत आहे तेव्हा तिला कसलीच काळजी राहिली नाही.
पलकनं पुढे तिच्या आईवर असलेल्या तिच्या एकतरफी प्रेमाविषयी बोलताना म्हणाली, 'आमच्या परिस्थितीत हे 50-50 नाही. हे पूर्णपणे एकतरफी आहे. मी माझ्या आईवर ऑबसेस्ड आहे आणि ती मला सहन करते. तिला करावचं लागतं, कारण शेवटी मी तिची मुलगी आहे. जे काही असो मी माझ्या आईविषयी खूप ऑबसेस्ड आहे. मी आजही दिवसभरात तिला 30 वेळा फोन करते आणि ती बऱ्याचवेळा माझे हे कॉल इग्नोर करत असते.'
हेही वाचा : अर्जुन कपूरच्या बहिणीचा फोटो पाहून नेटकऱ्यांनी केली सावत्र आई श्रीदेवीशी तुलना, म्हणाले...
पलकनं सलमानसोबत काम करण्याचा तिचा अनुभव सगळ्यांसोबत शेअर केला आहे. सलमानच्या सेटवर काम करताना मुलींसाठी असलेले नियम यावेळी तिनं सांगितले. तर सलमानच्या या चित्रपटात त्याच्यासोबत पूजा हेगडे, राघव जुयाल, शहनाज गिल, वेंकटेश दग्गुबाती, जगपति बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंह, अभिमन्यु सिंह,सिद्धार्थ निगम, जस्सी गिल आणि विनाली भटनागर यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे. ही एक रोमॅन्टिक आणि अॅक्शन फिल्म आहे.
पलक विषयी बोलायचे झाले तर ती नेहमीच तिच्या रिलेशनशिपच्या चर्चांमुळे चर्चेत होते. सगळ्यात आधी पलकचं नाव सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत जोडण्यात आले होते. पण आम्ही चांगले मित्र आहोत असं तिनं मुलाखतीत सांगितलं.