अक्षय कुमारचा 'भूत बंगला' चित्रपट हिट होणार! ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेले 'हे' 3 कलाकार देणार नवी दिशा

बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमारला बऱ्याच दिवसांपासून एकही मोठा चित्रपट मिळत नाहीये. त्याचे शेवटचे 6-7 चित्रपट फ्लॉप झाले आहेत. सध्या तो त्याच्या 'भूत बंगला' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात एका नवीन अभिनेत्याचाही प्रवेश झाल्याचे बोलले जात आहे. जो अक्षय कुमारच्या या चित्रपटासाठी नवीन दिशा देऊ शकतो. 

Soneshvar Patil सोनेश्वर पाटील | Updated: Sep 12, 2024, 12:33 PM IST
अक्षय कुमारचा 'भूत बंगला' चित्रपट हिट होणार! ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेले 'हे' 3 कलाकार देणार नवी दिशा title=

Akshay Kumar New Movie Bhooth Bangla : अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. यामुळे प्रेक्षकांचा उत्साह आणखी वाढला आहे. एवढेच नाही तर अक्षय कुमारचा 'भूत बंगला' हा चित्रपट अभिनेता कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 3' ला देखील टक्कर देऊ शकतो. अक्षय कुमारने त्याच्या वाढदिवशी या नवीन चित्रपटाची घोषणा केली होती. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव 'भूत बंगला' असे आहे. त्यामुळे या चित्रपटात अक्षय कुमारची कॉमेडी स्टाइल पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. 

हे 3 कलाकार बदलणार अक्षय कुमारचं नशीब

अक्षय कुमारच्या आगामी 'भूत बंगला' या चित्रपटात 3 मोठ्या कलाकारांनी प्रवेश केला आहे. या तिन्ही कलाकारांनी यापूर्वी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यामध्ये परेश रावल, राजपाल यादव आणि असरानी या कलाकारांचा समावेश असणार आहे. जे याआधी देखील अशा अनेक चित्रपटांमध्ये दिसले आहेत. ज्यांनी त्यांच्या अभिनयातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या तिन्ही कलाकारांनी अभिनेता अक्षय कुमारसोबत 'हेरा फेरी', 'गरम मसाला' आणि 'भूल भुलैया' या सारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'भूत बंगला' कधी होणार प्रदर्शित? 

 प्रियदर्शन अक्षय कुमारचा 'भूत बंगला' चित्रपट दिग्दर्शित करत आहे. अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. या जोडीने हेरा फेरी, भागम भाग आणि भूल भुलैया यासारख्या अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अक्षय कुमारचा 'भूत बंगला' हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहात दाखल होण्याची शक्यता आहे. अक्षय कुमारने या चित्रपटाची घोषणा केल्यापासून चाहते देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.