Paresh Rawal Shared Actress Video: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांच्यावर सध्या टीकेची झोड उठवली जात आहे. एका इटालियन अभिनेत्रीची व्हिडीओ त्यांनी शेअर केल्यानंतर त्याच्यावर टीका केली जात आहे. अनेकांनी परेश रावल यांना कठोर शब्दांमध्ये सुनावलं आहे. हा प्रकार नेमका काय आहे? व्हिडीओ कसला आहे? व्हिडीओत दिसणारी महिला कोण आहे? जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय...
हा व्हिडीओ म्हणजे 'मालेना' नावाच्या चित्रपटातील एक सीन आहे. या सीनमध्ये काही शाळकरी मुलं एका महिलेला पाहण्यासाठी कशाप्रकारे धडपडत तिला अगदी घरापर्यंत पाठलाग करतात हे दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर यापैकी एका मुलाला या सौंदर्यवतीशिवाय काहीच सूचत नाही. तो तिच्या घरासमोर जाऊन बसतो. त्यावेळी अचानक ती घराचा दरवाजा उघडून त्याला जवळ बोलावतो. त्याला पैसे देताना ती नाणी तिच्या पायाशी टाकते. ही नाणी उचलताना या मुलाची नजर तिच्या उघड्या मांड्यांवर पडते आणि तो उत्तेजित होतो. मात्र नंतर हे स्वप्न असल्याचं पुढच्याच दृष्यात स्पष्ट होतं. नंतर हा मुलगा सगळीकडे या महिलेचा पाठलाग करतो. व्हिडीओ संपताना एकेठिकाणी या महिलेची मदत करताना तिला चोरटा स्पर्श करतानाचा दाखवण्यात आलं आहे.
नक्की वाचा >> 'तुमची इच्छा असेल तर शरीरसंबंध ठेवा पण...'; सुष्मिता सेनचा मुलींना मोलाचा सल्ला
या व्हिडीओमध्ये दिसणारी महिला ही इटालियन अभिनेत्री मोनिका बेल्युसी आहे. मोनिकाने 2000 साली एरिऑटीक ड्रामा असलेल्या 'मालेना' चित्रपटातील हा सीन आहे. हा सीन परेश रावल यांनी शेअर करत त्यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. "ओह माय गॉड... हे फारच सुंदर, मन ढवळून टाकणारं आहे. हा व्हिडीओ कधीच संपायला नको होता," असं म्हणत अभिनेत्रीला टॅग केलं आहे.
Oh my god ! So beautiful and stirring ! You wish that the video never ends ! @aMonicaBellucci https://t.co/zRMaqCjMFL
— Paresh Rawal (@SirPareshRawal) July 20, 2024
परेश रावल यांनी या व्हिडीओमधील चित्रपटातील दृश्य आणि आशयावरुन प्रतिक्रिया नोंदवलेली असतानाच अनेकांनी या ज्येष्ठ अभिनेत्यालाच यावरुन ट्रोल केलं आहे. 'हेरा फेरी' चित्रपटामध्ये बाबू भय्याची भूमिका साकारणाऱ्या परेश रावल यांना अनेकांनी भावनांवर नियंत्रण ठेवा असा खोचक सल्ला दिला आहे. "आहो, सर तुमच्या अधिकृत अकाऊंटवरुन हे पोस्ट झालं आहे," असं म्हणत रावल यांना ट्रोल केलं आहे. तर अन्य एकाने, "अकाऊंट स्विच करायला विसरले वाटतं," असा टोमणा मारला आहे.
नक्की वाचा >> 'त्याने मला...', 'मिर्झापूर'मधील इंटीमेट बेडरुम सीनबद्दल 'सलोनी भाभी'चा खुलासा; म्हणाली, 'मी स्वत:ला..'
एका फॉलोअर्सने ही पोस्ट पाहून, "कोणत्याही मोठ्या आणि प्रसिद्ध व्यक्तीने असं काही पोस्ट केल्याचं यापूर्वी पाहिलेलं नाही. याबद्दल काय बोलावं, आपण फार विचित्र जगात राहतो," अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. तर अन्य एकाने परेश रावल यांना ट्रोल करताना, "भाईसाहाब आप ये किस लाईन मे आ गये आप," असा डायलॉग मारत 'तुमचं काहीतरी चुकतंय' असं सूचित केलं आहे. अनेकांचा स्वर तुमचं हे काय सुरु आहे असाच आहे.