Abhidnya Bhave प्रेग्नंट? अभिनेत्रीच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंटनं एकच चर्चा

Abhidnya Bhave Post Viral : अभिज्ञा भावे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून तिनं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली असून त्यावरून ती प्रेग्नंट आहे अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, तिच्या पतीनं देखील या पोस्टवर कमेंट केली आहे. मात्र, त्यावरून काही अंदाज बांधता येत नाही आहे. 

दिक्षा पाटील | Updated: May 22, 2023, 05:59 PM IST
Abhidnya Bhave प्रेग्नंट? अभिनेत्रीच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंटनं एकच चर्चा  title=
(Photo Credit : Social Media)

Abhidnya Bhave Post Viral : मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावे ही चांगलीच चर्चेत आहे. अभिज्ञा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांशी संपर्कात राहते. अभिज्ञा ही तिच्या नवऱ्यासोबतचे फोटो नेहमीच शेअर करताना दिसते. त्या दोघांची जोडी ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. नुकताच अभिज्ञानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला पाहता अनेकांनी त्यावर कमेंट करत ती प्रेग्नंट आहे का असा सवाल केला आहे. 

अभिज्ञानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिज्ञानं तिच्या पतीसोबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिज्ञानं काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे तर तिचा पती मेहुल पैनं प्रिंटेड शर्ट आणि जीन्स परिधान केली आहे. खरंतर अभिज्ञानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिज्ञाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिज्ञाच्या या पोस्टवर कमेंट करत तिचा पती मेहुल पैनं डोळ्यात हार्ट इमोजी असलेले इमोजी शेअर केले आहेत. अभिज्ञाची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी त्यावर कमेंट करत म्हणाला, 'प्रेग्नंट आहेस का?' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तुझ्याकडे बघून वाटतंय गूड न्यूज आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'बेबी होणार आहे का?' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'अभिज्ञा मॅम प्रेग्नंट आहात का?' तर एक नेटकरी अभिज्ञाला ट्रोल करत म्हणाला, 'मराठी नाहीयेस तू....... डुप्लिकेट आहेस....मराठी द्रोही.... नवरा तर परप्रांतीय केलाय... कशाला देखावा करतेस.' तर काही नेटकऱ्यांनी मेहुल पैला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर एक नेटकरी म्हणाला, 'मला तू खूप आवतेस.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तुम्ही दोघं एकत्र सुंदर दिसतात.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'ज्या प्रकारे तो तुझ्याकडे बघतो ते खूप सुंदर आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'तुमच्या दोघांवर देवाचा आशीर्वाद राहू दे.' 

हेही वाचा : तुझा नवरा काही बोलला नाही का? 'फकाट'मधल्या Kissing सीनवर रसिका सुनीलचं वक्तव्य चर्चेत

दरम्यान, अभिज्ञाचा पती मेहूलनं कमेंट केली असली तरी देखील त्यावरून ती प्रेग्नंट आहे की नाही याची खात्री झालेली नाही. तर अभिज्ञा आणि मेहुल पै विषयी जाणून घ्यायचे झाले तर मेहुलचं लग्न जानेवारी 2021 साली झाले होते. अभिज्ञा ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.