करण जोहरचं परिणीती चोप्राच्या लग्नाबाबत मोठं वक्तव्य

 करण जोहरने परिणीती चोप्राच्या लग्नाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Updated: Jan 16, 2022, 07:51 PM IST
करण जोहरचं परिणीती चोप्राच्या लग्नाबाबत मोठं वक्तव्य title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा लग्न कधी करणार? हा असा प्रश्न आहे ज्याच्या उत्तराची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र आता या प्रश्नाचं उत्तर करण जोहरने दिलं आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये याचा खुलासा झाला आहे. या प्रोमोमध्ये करण जोहरने परिणीती चोप्राच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे.

परिणीतिने करणला सांगितलं तु का केलं नाही माझं मॅच मेकिंग
परिणीती चोप्रा लवकरच 'हुनरबाज' या रिअॅलिटी शोला जज करताना दिसणार आहे. करण जोहर व्यतिरिक्त मिथुन चक्रवर्ती देखील अभिनेत्रीसोबत शोला जज करताना दिसणार आहे. या शोचा प्रोमो नुकता समोर आला आहे. 

या प्रोमोमध्ये करण जोहर म्हणत आहे की, 'मी या कपलसाठी खूप भाग्यवान आहे. बरेच मॅच मेकिंग केले आहे आणि ते यशस्वीही झाले आहेत. यावर परिणिती म्हणाली- 'तू माझ्यासाठी कधीच मॅच मेकिंग केलं नाहीस.' या प्रश्नाच्या प्रत्युत्तरात करण म्हणतो, 'पुढे पाहा आणि काय होते ते पहा. तुम्हालाही या वर्षी खात्री असेल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आज तु घर एकटी नाही जाणार
या प्रोमोमध्ये पुढे दाखवण्यात आलं आहे की, भारती सिंह म्हणते- 'परीला वाटतं की चॅनलवाले तिचं नातं जुळवतील.' यानंतर भारती आणि हर्ष शोमध्ये आलेल्या स्पर्धकांना तिच्याशी कनेक्शन सेट करणअयाचा सल्ला देतात. तर दुसरीकडे, एका स्पर्धकाला पाहून करण जोहर म्हणतो- 'मी तुम्हाला आज दाव्याने सांगू शकतो की, तू जाणार 
ईथून एकटी घरी जाणार नाही सिंगल..'