परिणीती, का खोट बोलते ? वर्गमित्राचा सवाल

अभिनेत्री परिणीती चोप्रा ही आपल्या बोलण्यामुळे चांगलीच अडचणीत आली आहे. बॉलीवूडच्या सेलिब्रिटींना अनेक ठिकाणी कार्यक्रमांना आयोजित करण्यात येतं.

Updated: Jun 1, 2017, 12:05 PM IST
 परिणीती, का खोट बोलते ? वर्गमित्राचा सवाल title=

मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्रा ही आपल्या बोलण्यामुळे चांगलीच अडचणीत आली आहे. बॉलीवूडच्या सेलिब्रिटींना अनेक ठिकाणी कार्यक्रमांना आयोजित करण्यात येतं. महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले देणाऱ्या एका संस्थेने परिणीतीला बोलावलं होतं, तेथे बोलण्याच्या ओघात परिणीती खूप काही बोलून गेली, मात्र यानंतर तिच्या लहानपणाच्या एका मित्राने तू किती खोटं बोलतेयस याचा धडाच त्याने फेसबुकवर छापला.

अभिनेता अक्षय कुमारसोबत या कार्यक्रमात बोलताना परिणीती म्हणाली, आमची परिस्थिती हालाखीची होती, यामुळे मला सायकलने शाळेत जावं लागत होतं, तसेच मार्शल आर्टस शिकण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे देखील नव्हते, शालेय जीवनात छेडछाडीच्या अनेक प्रकारांना सामोरं जावं लागलं असल्याचंही परिणीतीने सांगितलं, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तिच्या एका लहानपणीच्या मित्राच्या पाहण्यात आला.

तेव्हा परिणीतीचा मित्र म्हणाला,  ‘परिणीती तुला एका चांगल्या कुटुंबाची पार्श्वभूमी असूनही तू प्रसारमाध्यमांसमोर किती खोटं बोलत आहेस?  तुझ्याच शाळेचा विद्यार्थी असल्यामुळे मला तुझ्या वडिलांकडे असलेली गाडीसुद्धा आठवतेय. राहिली गोष्ट सायकलवरुन शाळेत येण्याची, तर तेव्हा तो ट्रेंडच होता. त्यामुळे ज्यांना त्यावेळी सायकलवरुन शाळेत येण्याची संधी मिळाली नाही त्यांना याची खंत वाटायची’, असं कानू गुप्ताने त्याच्या एफबी पोस्टमध्ये लिहिलं आहे.