SSR Case : पार्थ पवारांनी गृहमंत्र्यांकडे सीबीआय चौकशीची केली मागणी

गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत पार्थ पवार यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी विनंती पत्राद्वारे केली.   

Updated: Jul 27, 2020, 05:59 PM IST
SSR Case : पार्थ पवारांनी गृहमंत्र्यांकडे सीबीआय चौकशीची केली मागणी

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला जवळपास ४० दिवसांचा काळ लोटला आहे. तरी देखील त्यांच्या आत्महत्ये मागील ठोस कारण समोर आले नाही. त्याच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत ३७ पेक्षा जास्त जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. एवढचं नाही तर सुशांतची आत्महत्यानसून हत्या आहे, असं वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले जात आहे. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येबाबत चौकशी सोपवण्यात यावी, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत पार्थ पवार यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी विनंती पत्राद्वारे केली. सध्या हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी योग्य चौकशी व्हावी अशी भावना संपूर्ण देश आणि विशेषत: तरुणांची आहे. त्यामुळे याप्रकरणी सीबीआय चौकशी सुरू करण्यात यावी. ' असं ट्विट पार्थ पवार यांनी केलं आहे. 

याआधी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील सुशांत मृत्यू प्रकरणी CBI चौकशीची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याकडे केली होती. आम्हाला तुमचं पत्र २० जुलै रोजी मिळालं.' असं उत्तर मोदींनी एका पत्राच्या माध्यमातून दिलं.

एकंदर पाहता मोदींनी सुब्रमण्यम स्वामींच्या पत्राची दखल घेतल्यामुळे आता या प्रकरणाला गती प्राप्त होण्याचे संकेत मिळाले आहे. परिणामी सुशांतने आत्महत्या का केली असावी.  त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली.. हे रहस्य आता लवकरच उलगडणार असं चित्र समोर येत आहे.