पवनदीप आणि अरूणिताचा रोमांटिक डान्स व्हायरल; चाहत्यांनाही आवडली त्यांची केमेस्ट्री

'रातां लम्बियां'  गाण्यावर पवनदीप आणि अरूणिताचा रोमांटिक डान्स

Updated: Aug 31, 2021, 12:11 PM IST
पवनदीप आणि अरूणिताचा रोमांटिक डान्स व्हायरल; चाहत्यांनाही आवडली त्यांची केमेस्ट्री title=

मुंबई : 'इंडियन आयडल 12' चा विजेता पवनदीप राजन आणि अरूणिता कांजिलाल सध्या तुफान चर्चेत आहे. पवनदीप आणि अरूणितामध्ये लव्ह कनेक्शन असल्याची चर्चा रंगत आहे. पण पवनदीप आणि अरूणिताने दोघांच्या नात्याचा खुलासा केला. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत असा खुलासा त्यांनी केला. आता दोघांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.  

व्हिडिओमध्ये पवनदीप आणि अरुणिता डान्स करताना दिसत आहेत.  त्यांनी 'शेरशाह' चित्रपटातील 'रातां लम्बियां' गाण्यावर ठेका धराल. अरुणिता आणि पवनदीप यांची केमेस्ट्री चाहत्यांना देखील फार आवडली आहे. त्यांच्या डान्स व्हिडिओवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेन्टचा वर्षाव होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान; जेव्हा शोची सुरूवात झाली तेव्हापासून अरूणिता कांजीलाल आणि पवनदीप राजन यांच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र पसरल्या. शो मेकर्सद्वारा त्यांच्या नात्याला लव्ह एँगल देण्यात आला. त्यांच्या एँगलची सोशल मीडिया टीका देखील करण्यात आली. पण शेवटपर्यंत या दोघांच्या जोडीने आणि गोड आवाजाने सर्वंचं लक्ष वेधून घेतलं.  

पार्श्वसंगीतासाठी पवनदीप तयार 
सांगायचं झालं तर पवनदीप 2015 साली 'द व्हॉयस' शोचा विजेता ठरला होता. आता इंडियन आयडलमध्ये येण्याचं  कारण वियजी होणे नव्हतं तर नवं काही तरी शिकण्याची इच्छा होती. आता पवनदीपला पूर्ण विश्वास आहे की तो पार्श्वसंगीतासाठी तयार झाला आहे.