pawandeep आणि Arunita ने म्युझिक अल्बममधून प्रेम केलं व्यक्त

 म्युझिक व्हिडीओबद्दल प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच प्रचंड उत्सुकता होती. 

Updated: Oct 24, 2021, 07:25 PM IST
 pawandeep आणि Arunita ने म्युझिक अल्बममधून प्रेम केलं व्यक्त

मुंबई : इंडियन आयडल 12 चा विजेता पवनदीप राजन आणि स्पर्धक अरुणिता कांजीलाल यांचा म्युझिक व्हिडिओ 'मंजूर दिल' रिलीज झाला आहे. या म्युझिक व्हिडीओबद्दल प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच प्रचंड उत्सुकता होती. मात्र, आता गाणे रिलीज झाल्याने प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांची रोमँटिक शैली 'मंजूर दिल' म्युझिक व्हिडिओमध्ये दिसत आहे. यूट्यूब चॅनलवरून हा व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे.

पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल आता या म्युझिक व्हिडिओमध्ये आपलं प्रेम व्यक्त करताना दिसणार आहेत. पवनदीप आणि अरुणिता यांनी हे गाणं गायलं आहे.

दिग्दर्शक राज सूरानी यांनी तयार केलेले हे रोमँटिक गाणे आहे. अराफत मेहमूद यांनी हे सुंदर गाणे लिहिले आहे. तर पवनदीप राजन आणि आशिष कुलकर्णी यांचे संगीत आहे. पवनदीप-अरुणिताच्या आवाजात गायलेले 'मंजूर दिल' हे गाणे सगळ्यांच लक्षवेधून घेत आहे.