Bigg Boss OTT: प्रसिद्ध YouTuber अरमान मलिक सध्या खूपच चर्चेत आहे. त्याने दोन वेळा लग्न केलं आहे. बिग बॉस ओटीटी 3 मध्ये अरमान आणि त्याच्या दोन्ही पत्नी सहभागी झाल्या होत्या. मात्र, पहिल्याच आठवड्यात पायल मलिकला बिग बॉस ओटीटी 3 बाहेर काढण्यात आले. बाहेर येताच अरमानची पत्नी पायल मलिकने मोठा निर्णय घेतला आहे. पायल अरमान मलिकवर नाराज असल्याची चर्चा आहे. सध्या ती अरमानसोबत घटस्फोट घेणार आहे. तिने असं म्हटलं आहे की, ते दोघे खेळ खेळण्यात व्यस्त आहेत आणि मला येथे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
अरमानसोबत पायल घटस्फोट घेणार
बिग बॉस ओटीटी 3 मध्ये अरमान मलिक त्याच्या दोन पत्नी कृतिका मलिक आणि पायल मलिकसोबत घरात गेला होता. मात्र, पहिल्याच आठवड्यात पायल मलिकला बाहेर काढण्यात आलं. सध्या अरमान मलिक आणि कृतिका बिग बॉसच्या घरात आहेत. दरम्यान, बिग बॉसमधून बाहेर पडताच पायलने अरमान मलिकला घटस्फोट देऊन वेगळे राहण्याची घोषणा केली आहे.
पायल ट्रोलिंगने त्रस्त
बिग बॉसमधून बाहेर काढल्यानंतर पायल मलिक ट्रोलिंगचा सामना करत आहेत. सध्या ती धक्कादायक विधाने करत आहे. तिने म्हटलं आहे की, अरमान मलिक आणि कृत्रिका बिग बॉसच्या घरात आहेत. दोघेही तिथे खेळ खेळण्यात व्यस्त आहेत. मी इथे 4 मुलांची काळजी घेत आहे. त्याचसोबत ट्रोलिंगचा देखील सामना करत आहे. याचा मला त्रास होत आहे. त्यामुळे अरमानसोबत पायल घटस्फोट घेणार आहे.
अरमान कृतिकासोबत राहू शकतो
आतापर्यंत हे फक्त माझ्याबद्दलच होते म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष करत होते पण आता हा द्वेष माझ्या मुलांपर्यंत पोहोचत आहे. अरमान मलिकच्या दोन लग्नांवर लोक खूश नाहीत. त्यामुळे आता मी हा द्वेष सहन करू शकत नाही. मी अरमानपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. तो कृतिकासोबत राहू शकतो. मी माझ्या मुलांची काळजी घेईन. असं पायल मलिकने म्हटलं आहे.
अरमानने 3 वेळा लग्न केलं
प्रसिद्ध YouTuber अरमान मलिकने 3 वेळा लग्न केलं आहे. अरमानचे पहिले लग्न बालविवाह होते. त्यानंतर त्याने दुसरे लग्न हे पायल मलिकसोबत केले. त्यानंतर तिसरे लग्न हे पायलची मैत्रिण कृतिकासोबत केलं. सध्या अरमान हा पायल आणि कृतिकासोबत राहतो.